हॉटेल स्टाईल चमचमीत डाल खिचडी कशी बनवायची? जाणून घ्या एकदम सोपी रेसिपी Freepik
लाईफस्टाईल

Spicy Dal Khichdi: हॉटेल स्टाईल चमचमीत डाल खिचडी कशी बनवायची? जाणून घ्या एकदम सोपी रेसिपी

Dal Khichdi: दाल खिचडी ही एक अशी डिश आहे जी सर्वांना खूप आवडते. अशा परिस्थितीत, तुम्ही या खास रेसिपीचे अनुसरण करून घरी चविष्ट आणि मसालेदार दाल खिचडी बनवू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुम्हीही घरच्या घरी काहीतरी मसालेदार बनवण्याचा प्रयत्न करताय, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज तुम्हाला अशा एका रेसिपीबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही घरच्या घरी काही वेळातच बनवू शकता. हा पदार्थ खाण्यासाठी स्वादिष्ट तर आहेच, त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

स्वादिष्ट दाल खिचडी

डाल खिचडी हा एक असा पदार्थ आहे, जो लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडते. ती बनवण्यासाठी सोप्पी तर आहेच आणि पौष्टिक देखील आहे. जर तुम्हाला घरच्या घरी डाल खिचडी बनवायची असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

डाल खिचडी बनवण्याचे साहित्य

मसालेदार डाल खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य. १ कप तांदुळ, १/२ कप मुगडाळ, १ बारीक चिरलेला कांदा, २ मोठे टॉमेटो, २ हिरव्या मिरच्या, १ इंच किसुन घेतलेलं आद्रक. १ चमचा हळद, १ चमचा धने पावडर, १ चमचा लाल मिरची पावडर, १ चमचा जीरा पावडर, १ चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, कोथंबिर, लिंबाचा रस आणि एक कप तेल. या संपूर्ण साहित्याचा वापर करून तुम्ही स्वादिष्ट डाल खिचडी बनवू शकता.

मसालेदार डाल खिचडी बनवणयाची प्रक्रिया

मसालेदार डाल खिचडी बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी मुग डाळ स्वच्छ धुवून कमीत कमी ३० मिनीट पाण्यामध्ये भिजवून ठेवा. अशाच प्रकारे तांदुळ देखील दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून भिजवत ठेवा.

आता, एका कुकरमध्ये तेल टाका तेल चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यात जीरा टाकून फोडणी द्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची चांगल्या प्रकारे परतून घ्या. त्यात किसलेलं आद्रक घाला.

हे पदार्थ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. नंतर त्यात, हळद, धने पावडर, जीरा पावडर टाकून ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर टॉमेटो टाकून ते चांगल्या प्रकारे परतून घ्या. मसाले शिजले की त्यात भिजत ठेवलेले डाळ आणि तांदुळ टाका.

त्यात आता ४ ते ५ कप पाणी टाकून चवीनुसार मीठ घाला. कुकर बंद करून २ ते ३ शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्या. थोड्या वेळानंतर गरमागरम डाल खिचडी प्लेटमध्ये काढून घ्या, त्यावर मस्त पैकी लिंबाचा रस पिळून कोथंबिर टाकून सर्व्ह करा.

आता तुमची मसालेदार खिचडी तयार आहे. जर तुम्हाला वाटले तर, त्यात कसूरी मेथी किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता. त्यामुळे तुमची डाल खिचडी आणखी स्वादिष्ट लागेल.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : ७२ तास महत्त्वाचे! १७ राज्यांत पाऊस धुमाकूळ घालणार; ८० किमी वेगाने वारे अन् ढगफुटीचा अंदाज, IMD चा अलर्ट

Tulsi after death: व्यक्तीच्या मृत्यूनंतर घरासमोर तुळशीचं रोप का लावतात?

Maharashtra News Live Update: चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी आमरण उपोषण सुरू

पत्नी, मुलाची हत्या करून व्यापाऱ्याने केली आत्महत्या, सरकारी योजनेवर ठपका

‘ऑपरेशन ब्लू स्टारवरून’ राजकारण तापलं, शरद पवारांनी गिरीश महाजनांना सुनावले, CM फडणवीस म्हणाले...;

SCROLL FOR NEXT