Surabhi Jayashree Jagdish
गरुड पुराणात तुळशीला भगवान विष्णूंना प्रिय असलेली पवित्र वनस्पती म्हटलंय. मृत्यूनंतर आत्म्याच्या कल्याणासाठी तुळशीचं महत्त्व विशेष सांगितलंय. त्यामुळे अंत्यविधीनंतर घरात तुळशीचे रोप लावणं शुभ मानण्यात येतं.
धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीची कृपा आत्म्याला शांती मिळवून देण्यास मदत करते. मृत्यूच्या वेळी तुळशीचं पान आणि गंगाजल देण्याची परंपरा याच श्रद्धेशी जोडलेली आहे. त्यामुळे तुळशीचं रोप आत्म्याच्या मोक्षमार्गाशी संबंधित मानलं जातं.
मृत्यूनंतर घरात दुःख आणि शोकाचं वातावरण असतं. अशा वेळी तुळशीचं रोप सकारात्मकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानलं जातं. धार्मिक श्रद्धेनुसार, ते नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करते.saam tv
तुळस वातावरण शुद्ध करणारी वनस्पती म्हणून ओळखली जाते. तिच्या उपस्थितीमुळे घरातील परिसर अधिक प्रसन्न आणि शांत वाटतो, अशी धारणा आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर तुळशीचं रोप लावण्याची प्रथा आहे.
गरुड पुराणात असं वर्णन आढळते की, तुळशीशी संबंधित पुण्यकर्मांमुळे आत्म्याला विष्णूंची कृपा प्राप्त होते. तुळशीचं पूजन हे भगवान विष्णूंच्या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते. त्यामुळे तुळशीचे रोप घरात लावणे धार्मिकदृष्ट्या मंगलकारक समजले जाते.
गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतरचे 13 दिवस आत्म्याच्या प्रवासासाठी महत्त्वाचे असतात. या काळात केले जाणारे विधी आत्म्याच्या पुढील प्रवासासाठी सहाय्यक मानले जातात. तुळशीचे रोप या संपूर्ण कालावधीत श्रद्धेचे केंद्र मानलं जातं.
गरुड पुराणातील वर्णनांचा उद्देश भीती निर्माण करणं नसून जीवनाचं महत्त्व समजावणं हा आहे. तुळशीचं रोप मनुष्याला सत्कर्म, श्रद्धा आणि अध्यात्माची आठवण करून देतं. त्यामुळे अंत्यविधीनंतर तुळस लावण्याची परंपरा ही आत्मिक शांतीचं प्रतीक मानली जाते.