South Africa Tourism news Saam tv
लाईफस्टाईल

South Africa Tourism : भारतीयांना दक्षिण आफ्रिकेत जाण्याची व्हिसा अर्ज प्रक्रिया होणार सोपी; पर्यटकांचा ताण कमी होणार

South Africa Tourism News : भारतीयांना दक्षिण आफ्रिकेत जाण्याची व्हिसा अर्ज प्रक्रिया सुरळीत होणार असल्याची माहिती दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डे लिले यांनी दिली.

Saam Tv

मुंबई : भारतातून दक्षिण आफ्रिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. 'दक्षिण आफ्रिकेकडून इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन आणला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना व्हिसासाठी थेट अर्ज करता येईल. याशिवाय ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रुप व्हिसा अर्ज सोपी होईल आणि प्रक्रिया कालावधी जलद होईल, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डे लिले यांनी दिली.

दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डे लिले आणि दक्षिण आफ्रिकन टुरिझन सीईओ नोम्बुलेलो गुलिवे भारताच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतील माध्यमांशी संवाद साधताना मंत्री पॅट्रिशिया डे लिले यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील नात्यावर भाष्य केलं. दक्षिण आफ्रिका यंदा आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक २०२७ आयोजित करण्यासाठी तयारी करत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेचा लाभ घेऊन प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करणार आहेत.

मंत्री डे लिले यांनी सांगितले की, व्हिसा प्रकिया सोपी झाल्यास दोन्ही देशांमधील पर्यटनाचे नाते आणखी मजबूत होईल. दक्षिण आफ्रिका २०२५ मध्ये जी२० अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार आहे. शाश्वत विकास, समन्वयित भरभराट आणि लोकांमधील नाते अधिक उत्तम करण्यासाठी वचनबद्ध आहेत.

मंत्री पॅट्रिशिया डे लिले म्हणाल्या की, 'भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील नाते इतिहासात खोलवर रूजलंय. ही भेट महत्त्वाच्या क्षेत्रांमधील आमचा समन्वय सखोल करेल. आमची भेट भारताच्या प्रवास व्यापार भागीदारांसोबत समन्वय करण्याची संधी असेल. त्यातून अर्थपूर्ण सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाणीला चालना मिळेल'.

दक्षिण आफ्रिकन टुरिझम सीईओ नोम्बुलेलो गुलिवे यांनी सांगितलं की, 'भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशादरम्यान नातं निर्माण करण्यात पर्यटन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम करते. आमच्या देशाचे अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य, बहुरंगी संस्कृती आणि हॉस्पिटॅलिटी यांचे प्रदर्शन घडवत असताना भारतीय पर्यटकांना दक्षिण आफ्रिकेत अद्भुत अनुभव घेण्यासाठी आम्ही प्रेरित करू शकू, अशी आशा आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेला भारतीय पर्यटकांसाठी पहिल्या क्रमांकाचे स्थान बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT