Zunka Bhakri Recipe: थंडीत रात्री जेवणासाठी करा खमंग स्वादिष्ट झुणका-भाकर, वाचा आजीची खास रेसिपी

Shruti Vilas Kadam

झुणका बनवण्यासाठी साहित्य

झुणका बनवण्यासाठी एक वाटी बेसन, दोन बारीक चिरलेले कांदे, हिरव्या मिरच्या, लसूण, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, तेल, मीठ आणि कोथिंबीर घ्या.

Zunka - Bhakri Recipe

फोडणी तयार करा

सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी आणि जिरे घाला. त्यानंतर कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून चांगले परतून घ्या. यामुळे झुणक्याला छान चव येते.

Zunka - Bhakri Recipe

कांदा आणि मसाले परतून घ्या

आता फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.

Zunka - Bhakri Recipe

बेसनाचे मिश्रण तयार करा

एका भांड्यात बेसन घ्या. त्यात थोडे पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने मिश्रण तयार करा. बेसनाचे मिश्रण खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावे.

Zunka Bhakri Recipe

झुणका शिजवून घ्या

आता कांद्याच्या फोडणीमध्ये बेसनाचे मिश्रण घाला. मंद आचेवर सतत हलवत शिजवा. बेसनातील पाणी आटून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. झुणका चांगला शिजल्यावर त्याला छान मोकळी रचना येते.

Gavran Zunka Recipe

गरमागरम भाकरी बनवा

भाकरी बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ घ्या. त्यात थोडे थोडे पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. त्यानंतर हाताने किंवा पाटावर भाकरी थापा. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. भाकरी छान फुगल्यावर तव्यावरून उतरवा.

Zunka Bhakri Recipe

झुणका-भाकरी सर्व्ह करा

तयार झुणक्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम झुणका ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व्ह करा. सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा, कच्चा कांदा आणि शेंगदाण्याची चटणी दिल्यास जेवणाची चव आणखी वाढेल. तयार आहे अस्सल मराठमोळा झुणका-भाकरीचा बेत!

Zunka Bhakri Recipe

Dark Circles Causes: ८ तास झोपूनही डोळ्यांखालील डार्क सर्कल्स का जात नाहीत? रोज करा 'हा' सोपा उपाय

Dark Circles Causes | Saam TV
येथे क्लिक करा