Social Media Side Effects  SAAM TV
लाईफस्टाईल

Social Media Side Effects: सोशल मीडियामुळे वाढतोय नात्यांमधील गुंता, काय खबरदारी घ्यावी?

Social Media Side Effects on Relationship: आजकालच्या काळात तुमच्या आयुष्याचे अपडेट इंस्टाग्राम स्टोरी वरून कळून येतात. मात्र यामुळे नात्यातील ओलावा कमी झाला असून नाती गुतांगुतीची होत जात आहेत.

Shreya Maskar

सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चाला आहे. सोशल मीडियामुळे लोक एकमेकांशी जोडले जात आहेत. पण हा संबंध फक्त ऑनलाइन होत असल्यामुळे नात्यांमधील प्रत्यक्ष ओलावा कमी झाला आहे. नात्यांमधील गुंता वाढत जात आहे.

आजकाल सोशल मीडियाचे सकारात्मक परिणामांपेक्षा नकारात्मक परिमाण पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियाचा सर्वात मोठा परिणाम आपल्या नातेसंबंधांवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. तासनतास घरात बसून लोक नवीन ऑनलाइन नाती जोडत आहेत. पण घरात असलेल्या कुटुंबाला वेळ द्यायला या लोकांना जमत नाही. जुनी नाती सोडून नवीन नाती बनवण्याचा ट्रेंड आयुष्यात समस्या निमार्ण करत आहे.

वास्तवात भेटीगाठी कमी

आजकाल सर्वात जास्त वेळ लोक सोशल मीडियावर घालवत आहे. यामुळे त्यांच्या नातेसंबंधावर वाईट परिणाम होताना दिसत आहे. जरी सोशल मीडियामुळे जग जोडले गेले असले तर सोशल मीडियामुळेच अनेक नाती तुटली आहे. कारण सोशल मीडियामुळे लोकांचा प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे वास्तवात व्यक्तींचे भेटणे होत नाही. यामुळे त्यांच्या संबंधांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळते.

फसवणूकचा धोका

ऑनलाइन नात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याचा धोका असतो. यामुळे सोशल मीडियाचा वापर जपून करावा. ऑनलाइन फसवणूकीमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नात्यात गैरसमज वाढतो

या सोशल मीडियाच्या काळात बाजूला बसणारी लोक सुद्धा मेसेजमध्ये बोलतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये गैरसमज वाढत आहेत. त्यांच्यात मोकळा संवाद घडत नाही. यामुळे ही समस्या उद्भवतात.

ऑनलाइन आयुष्याचा अपडेट

तुमच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे ते तुमचा मूड कसा आहे. यापर्यंत सर्व अपडेट तुम्हाला एका सोशल मीडियाच्या स्टोरी वरून कळते. आजकाल ऑनलाइन प्रेम जमून ऑनलाइन ब्रेकअप केले जात आहेत. कारण प्रत्यक्षात न भेटता नाते जपणे खूप कठीण असते. हे सर्वांनाच जमते असे नाही. सोशल मीडियाचा असाच वाढता वापर नात्यांमध्ये कटुता आणून नाती तोडू शकतो. यामुळे वेळीच सावध व्हा आणि आपली नाती जपा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

SCROLL FOR NEXT