Relationship Tips: जोडीदारासोबत वारंवार खोटं बोलताय? येऊ शकतो नात्यात दुरावा

Relationship Tips:: अनेक वेळा व्यक्ती जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी खोटे बोलते, जोडीदाराच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून सत्य लपवत असते मात्र या सर्वांचा परिणाम हा त्यांच्या नात्यावर होत असतो.
Relationship Tips:
Relationship Tips:Saam Tv

Realtionship Tips: नाते हे केवळ प्रेमाचे नसून ते विश्वासाचे असते. नात्यात विश्वास हा अत्यंत महत्वाचा असतो. एकदा का व्यक्तीने नात्यात विश्वास गमावला की नात्यात दुरावा यायला वेळ लागत नाही. नात्यात खोटे बोलताना समोरच्या व्यक्तीचे हावभाव जाणून घेणे महत्वाचे असते. सत्य हे प्रत्येक नात्याचा महत्वाचा पाया आहे. नातेसंबंध टिकून राहण्यासाठी अनेकदा व्यक्ती खोटे बोलतात.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, लोक बहुतेक वेळा खोटं बोलतात कारण त्यांना त्यांच्या नात्यात दुरावा आणायचा नसतो. मात्र खोटे बोलल्याने व्यक्तीला सुरक्षित वाटते. ज्याचा उद्देश नातेसंबंध मजबूत आणि आनंदी असणे हा मानला जातो.

अनेक वेळा व्यक्ती जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी खोटे बोलतात, जोडीदाराच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून सत्य लपवत असतात. मात्र या सर्वांचा परिणाम हा त्यांच्या नातेसंबंधावर होत असतो.

Relationship Tips:
Relationship Tips : राग आणि अहंकारामुळे नात्यात येतो दुरावा, 'या' पद्धतींचा वापर करून पाहा

1) खोटे बोलल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद येत असला तरी हा आनंद काही काळापुरता असल्याचे समोर आले आहे. तर त्याचा नकारात्मक परिणाम हा थेट नातेसंबंधावर होतो.

2) खोटे बोलल्याने नात्यातील दुरावा वाढतो, ज्या व्यक्तीशी आपण खोटे बोललो आहे. त्या व्यक्तीला आपल्याशी बोलण्याची इच्छा वाटत नाही.

3) खोटे बोलल्याने नातेसंबंधामध्ये अधिक तणाव आणि चिडचिडेपणा वाढतो. ज्यामुळे वाद होतात.

4) जेव्हा तुमच्या जोडीदाराला कळते की तुम्ही त्याच्याशी खोटे बोलत आहात. तेव्हा त्याचा तुमच्यावरचा अविश्वास वाढतो.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com