Relationship Tips
Relationship TipsSaam Tv

Relationship Tips : चुकूनही या स्वभावाच्या लोकांशी लग्न करु नका, आयुष्य होईल खराब

Marriage Tips : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यात प्रत्येक प्रेमी जोडप्याला असे वाटते की, यावर्षी तरी आपण लग्न करावे. लग्न हे दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबांचे असते. त्यासाठी काही निर्णय घेताना बरेचदा आपल्याला विचार करावा लागतो.

Should Never Marry A Person With These Nature :

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यात प्रत्येक प्रेमी जोडप्याला असे वाटते की, यावर्षी तरी आपण लग्न करावे. लग्न हे दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबांचे असते. त्यासाठी काही निर्णय घेताना बरेचदा आपल्याला विचार करावा लागतो.

लग्नाला (Marriage) पवित्र बंधन म्हणून ओळखले जाते. प्रेमापासून सुरु झालेला हा प्रवास कायम टिकवण्यासाठी आणि नात्याला नाव देण्यासाठी लग्न करतात. नात घट्ट करण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसून त्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज करत असाल तर तुमच्या पार्टनरविषयी (Partner) तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

लग्न करताना तुमच्या जोडीदाराचा स्वभाव कसा आहे हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. तुमचा जोडीदार म्हणून योग्य आहे का? नात्यात (Relationship) अडकल्यानंतर तो आपली जबाबदारी नीट घेऊ शकतो का? असे एक नी अनेक प्रश्न मनात येतात. जर तुम्ही देखील लग्न करण्याचा विचार करत असाल तर चुकूनही अशा स्वभावाच्या व्यक्तींशी करु नका.

1. खोट बोलणारा

बरेचदा आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जोडीदाराशी खोटे बोलतो. जर तुमचा जोडीदार तुमच्याशी वारंवार खोट बोलत असेल, वचन मोडत असेल तर हा त्याचा मूळ स्वभाव आहे हे समजून घ्या.

Relationship Tips
Relationship Tips : पार्टनर खरं प्रेम करतोय की, टाइमपास? या ५ गोष्टींवरुन कळेल

2. नियंत्रण ठेवणारा

लग्नानंतर पती-पत्नी दोघांनाही एकमेकांची जबाबदारी घ्यावी लागते. त्यासाठी योग्य सल्लाही दिला जातो. परंतु, तुमचा पार्टनर तुमच्यावर सतत नियंत्रण ठेवत असेल तर हे चुक आहे. यामुळे नात्यात दूरावा येऊ शकतो. यामध्ये सतत घरचे किंवा तुमच्या जवळच्या मित्रांना भेटू नका, माझ्या परवानगिशिवाय बोलू नका. अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर वेळीच काळजी घ्या.

3. आदर

कोणत्याही नात्यात महत्त्वाचा असतो तो आदर. जर तुमचा पार्टनर आदर करत नसेल किंवा सतत अपमान करत असेल तर हे नाते फार काळ टिकणार नाही. ज्यामुळे नात्यात न्यूनगंड निर्माण होईल. अशातच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल.

Relationship Tips
Relationship Tips : तुमचा पार्टनर रेड फ्लॅग आहे की, ग्रीन फ्लॅग? कसे कळेल? जाणून घ्या

4. चुका मान्य न करणे

जर तुमचा भावी जोडीदार चुका करुनही त्या मान्य करत नसेल तर वेळीच नात्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. चूका मान्य केल्यावर माणूस सुधारतो. अशा व्यक्तीला तुमच्या आयुष्याचा भाग न बनवल्यास चांगले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com