Relationship Tips : तुमचा पार्टनर रेड फ्लॅग आहे की, ग्रीन फ्लॅग? कसे कळेल? जाणून घ्या

How To Know Your Partner Green Or Red Flag : हल्ली सोशल मीडियावर तुमचा पार्टनर रेड फ्लॅग आहे की, ग्रीन फ्लॅग याविषयी काही माहिती दिली जाते. त्यानुसार तुमचा पार्टनर कोणत्या कॅटेगरीत मोडतो हे कळते. याचा अर्थ काय? हे कसे ठरवले जाते? जाणून घेऊया.
Relationship Tips, How To Know Your Partner Green Or Red Flag
Relationship Tips, How To Know Your Partner Green Or Red FlagSaam Tv
Published On

What Is Red And Green Flag In Relationship :

प्रत्येक नात्याचे वेगळेपण असते. यामध्ये अनेक गुण आणि दोष आपल्याला पाहायला मिळतात. परंतु, जेव्हा नात्याचा पूर्णपणे विचार केला जातो तेव्हा काही गोष्टी ठरवणे अधिक गरजेचे असते.

नातं (Relationship) हे समजायला जितके सोपे आहे तितकेच अवघड देखील. परंतु, जोडीदार चांगला मिळाला तर नात्यातील काही उणीवा सहज दूर होतात. तसेच नाते अधिक काळ टिकते. यामध्ये जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाशी काही गोष्टी समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. हल्ली सोशल मीडियावर तुमचा पार्टनर (Partner) रेड फ्लॅग आहे की, ग्रीन फ्लॅग याविषयी काही माहिती दिली जाते. त्यानुसार तुमचा पार्टनर कोणत्या कॅटेगरीत मोडतो हे कळते. याचा अर्थ काय? हे कसे ठरवले जाते? जाणून घेऊया.

नात्यात संवादाला अधिक महत्त्व असते. नात्यात भांडण झाले किंवा कोणतीही समस्या आली की, त्यावर एकच उपाय म्हणजे संभाषण करणे. या गोष्टींमुळे नात्यात गैरसमज निर्माण होत नाही. तसेच तुमचा पार्टनर तुमच्याशी मनमोकळेपणाने गोष्टी शेअर करतो. स्वत:चे विचार व्यक्त करत असेल. नातेसंबंधांशी संबंधित अधिक प्रामाणिक असेल तर त्याला ग्रीन फ्लॅग ठरवले जाते.

Relationship Tips, How To Know Your Partner Green Or Red Flag
Popcorn Brain सिंड्रोम काय आहे? कसे कराल स्वत:ला कंट्रोल? जाणून घ्या

जर तुमचा जोडीदार फार कमी बोलत असेल, तुमच्याशी कोणतीही गोष्ट शेअर करत नसेल. तुमच्या मेसेजला किंवा कॉल्सला खूप लेट रिप्लाय करणे. तुमच्याशी स्पष्टपणे संवाद न करणे किंवा त्याला तुमच्यासोबतच्या नात्यात कोणताच रस नसणे अशा पार्टनरला रेड फ्लॅग म्हणून ठरवले जाते.

Relationship Tips, How To Know Your Partner Green Or Red Flag
Relationship Tips : नवऱ्याकडून बायकोला हव्या असतात या ५ गोष्टी, वेळीच मिळाल्या तर नात्यात टिकून राहातो गोडवा

बरेचदा असे होते की, एका काळानंतर नात्यात दूरावा येतो. तसेच कालांतराने एकमेकांसाठी केले जाणारे प्रयत्न कमी होतात. तसेच यामध्ये करिअरला देखील अधिक महत्त्व दिले जाते. जोडीदारासोबत भविष्याची चर्चा करणे. रेड फ्लॅग असणाऱ्या मुलगा किंवा मुलीपासून नेहमी लांब राहाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच तुम्हाला समजून घेणाऱ्या आणि सपोर्ट करणारा पार्टनर निवडा असा सल्ला देखील देण्यात येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com