Health Risks  Saam tv
लाईफस्टाईल

Smoking-Related Health Risks : सिगारेट ओढाल...तर लवकर मराल; धुम्रपानामुळे आयुष्याच्या 10 वर्षांची होते राख, VIDEO

life reduction : तुम्ही जर सिगारेट ओढताय....तर वेळीच सावध व्हा....लंडनमध्ये झालेल्या संशोधनात धुम्रपान करणाऱ्यांचे आयुष्य कसं कमी होतंय यासंदर्भात निष्कर्ष समोर आलाय.. एक सिगारेट कशा पद्धतीने? आणि किती आयुष्य कमी करते ?...पाहुयात या रिपोर्टमध्ये....

Saam Tv

धुम्रपान किती धोकादायक आहे हे वारंवार सांगूनही धुम्रपान करणाऱ्याची संख्या काही कमी होत नाहीये. श्वसनाचा त्रास, कमकुवत फुफ्फुसे, टीबी, कॅन्सर अशा अनेक धोक्यांची टांगती तलवार धुम्रपान करणाऱ्यांवर असतेच. आता संशोधनातून एक मोठा दावा करण्यात आलाय. एक सिगारेट तुमच्या आयुष्यातली साधारण 20 मिनिटं कमी करतेय...युनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष समोर आलाय...यापूर्वी केलेल्या संशोधनात सिगारेट तुमच्या आयुष्यातली 11 मिनिटं कमी करते, असा निष्कर्ष समोर आलेला .मात्र आता समोर आलेल्या संशोधनानुसार एका सिगारेटमुळे पुरुषांचे आयुष्य 17 मिनिटांनी तर महिलांचे आयुष्य 22 मिनिटांनी कमी होत असल्याचा निष्कर्ष समोर आलाय.

या अहवालात नक्की काय समोर आलंय पाहुयात...

धुम्रपान कराल तर लवकर मराल

धुम्रपान करणाऱ्यांचे आयुष्य कमी होते

आयुष्यातले शेवटचे काही दिवस गंभीर आजारांनी ग्रासलेले असतात

एका सिगारेटमुळे आयुष्यातली 20 मिनिटे कमी होतात

एका सिगारेटच्या पाकिटामुळे आयुष्य 7 तासांनी कमी होते

नियमित धुम्रपान करणारी व्यक्ती आयुष्यातली जवळपास 10 वर्षं गमावते

तर अशा पद्धतीने एक सिगरेट तुमच्या आयुष्याच्या 20 मिनिटांची राख करतेय...मात्र अजूनही उशीर झाला नाहीये...तुम्ही आताही जर धुम्रपान सोडाल तर तुमची गेलेली वर्ष परत मिळवू शकतात...यासंदर्भात अहवालात काय म्हटलंय पाहुयात

सिगारेट सोडा, आयुष्य परत मिळवा

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही धुम्रपान सोडा

20 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला आयुष्यालता एक आठवडा परत मिळू शकतो

या वर्षाच्या अखेरपर्यंत तुम्ही आयुष्यातले 50 दिवस परत मिळवू शकतात

सिगारेटमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कॅन्सर असे सर्व धोके माहीत असतानाही अनेक जण स्वत:चे आयुर्मान तर कमी करतच आहेत, मात्र त्यासोबतच आपल्या जवळच्यांचेही आयुर्मान घटवताय. कारण धुम्रपानाच्या एकूण मृत्यूंपैकी साधारण एक तृतियांश मृत्यू झालेले कधीही प्रत्यक्ष धुम्रपान करत नाही, तर धुम्रपान करणाऱ्यांच्या सहवासात असतात. त्य़ामुळे सिगारेट ओढून आणि सोबत असलेल्यांच्या आयुष्याची राख करायची की निरोगी आयुष्य जगायचं याचा सर्वस्वी निर्णय तुमच्या हातात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp New Feature: फालतू मेसेजेसची चिंता संपणार, WhatsApp लवकरच आणत आहे नवीन फिचर, वाचा सविस्तर

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

SCROLL FOR NEXT