Cigarettes weaken bones saam tv
लाईफस्टाईल

Cigarettes weaken bones: स्मोकिंग केवळ फुफ्फुसांसाठीच नाही, तर मणक्यालाही घातक! हाड कमकुवत होत असल्याचा डॉक्टरांचा इशारा

Smoking Slipped Disc Risk: म्रपानाचा वाईट परिणाम केवळ फुफ्फुसे आणि हृदयावरच नाही, तर आपल्या शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांवरही होतो. डॉक्टरांच्या मते, धूम्रपान केल्याने हाडे आणि पाठीचा कणा देखील कमकुवत होतो.

Surabhi Jayashree Jagdish

स्मोकिंग म्हणजेच धूम्रपान आरोग्यासाठी किती घातक आहे, हे जवळपास आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. फुफ्फुसांचं नुकसान, हृदयरोग, कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांशी स्मोकिंगचा थेट संबंध असतो हे लोकांना माहीत आहे. मात्र इतकं सगळं माहिती असूनही अनेकजण स्मोकिंग करणं सोडत नाहीत आणि या सवयीच्या जोखमीकडे दुर्लक्ष करतात.

अशातच आता डॉक्टर्सनी एक नवा इशारा दिलाय की, स्मोकिंगमुळे केवळ फुफ्फुसांचं नाही, तर पाठीच्या मणक्यांशी संबंधित स्लिप डिस्कसारख्या त्रासाचाही धोका वाढतोय.

स्लिप डिस्क म्हणजे काय?

स्लिप डिस्क ही अशी अवस्था आहे, ज्यामध्ये आपल्या मणक्यांमधील डिस्क तिच्या मूळ जागेवरून सरकते. त्यामुळे ती जवळच्या नसा दाब निर्माण करते आणि त्यामुळे कंबर, मान किंवा पायांमध्ये तीव्र वेदना जाणवू लागतात. हा त्रास झालेल्या व्यक्तीला हात-पाय सुन्न होणं, झिणझिण्या येणं, चालताना किंवा उठबस करताना त्रास होणं अशी लक्षणं दिसतात.

धूम्रपानामुळे का वाढतो स्लिप डिस्कचा धोका?

शिलॉन्गमधील उत्तर-पूर्वी इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य विज्ञान संस्थेच्या (NEIGRIHMS) डॉक्टर्सनी नुकत्याच केलेल्या एका शस्त्रक्रियेनंतर एक महत्त्वाचा निष्कर्ष मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, धूम्रपान करणाऱ्यांमध्ये स्लिप डिस्क (लंबर डिस्क हर्नियेशन) होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.

डॉ. भास्कर बोरगोहेन आणि त्यांच्या टीमने केलेल्या शस्त्रक्रियेद्वारे एका रुग्णाच्या पाठीच्या मणक्यांतील S1 नर्व्हवरचा दबाव कमी करण्यासाठी ट्यूबलर मायक्रोडिसेक्टोमी ही प्रक्रिया केली. यामध्ये स्लिप झालेली डिस्क आणि तिचे चार मोठे तुकडे बाहेर काढण्यात आले. या प्रकरणाच्या माध्यमातून त्यांनी धूम्रपानाचा आणि स्लिप डिस्कचा संबंध स्पष्ट केला.

सिगरेटच्या धुरामुळे कशाप्रकारे नुकसान होतं?

डॉ. बोरगोहेन यांच्या मते, सिगरेटच्या धुरामध्ये असणारे निकोटीन, कार्बन मोनोऑक्साईड आणि इतर विषारी केमिकल्स डिस्कच्या बाहेरील रिंगमध्ये असणाऱ्या कोलेजन फायबर्सना नुकसान पोहोचवतात. हे फायबर्स आपल्या डिस्कला आधार तर मजबूती देण्याचं काम करतात. त्याचबरोबर सिगरेटमुळे रक्तप्रवाह होण्यातही समस्या निर्माण होतात. कारण धूर ऑक्सिजनची पातळी कमी करतो.

परिणामी, मणक्याच्या आसपास असणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि डिस्कला पोषण मिळत नाही आणि ती कमकुवत होते. यामुळे डिस्क तुटू शकते किंवा बाहेर येऊ शकते, ज्यामुळे स्लिप डिस्क किंवा हर्नियेशन होण्याची शक्यता वाढते.

डॉक्टर्सनी दिली खास सूचना

NEIGRIHMS मधील डॉक्टर्सनी धूम्रपान करणाऱ्यांना इशारा दिला आहे की, स्मोकिंग केवळ फुफ्फुसांनाच नव्हे तर मणक्यालाही गंभीर इजा पोहोचवू शकतं. म्हणून स्मोकिंगपासून दूर राहणं केवळ स्लिप डिस्कचा धोका कमी करत नाही, तर संपूर्ण मस्क्युलोस्केलेटल हेल्थ म्हणजे हाडं, सांधे, स्नायू यांचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daya Dongre: चित्रपटात आपला ठसा उमठवणाऱ्या दया डोंगरे निवडणार होत्या 'हे' करिअर; पण झाल्या अजरामर अभिनेत्री

Bihar Election: ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान RJDने आपल्याच उमेदवाराला पक्षातून काढलं? काय आहे कारण?

Maharashtra Live News Update: अभिनेता किरण माने यांनी केलं ॲड. असीम सरोदेंचं कौतुक

Dev Diwali: यंदा देव दिवाळी कधी? पूजेचा शूभ मूहूर्त किती वाजता? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे ₹१५०० उद्यापासून मिळणार

SCROLL FOR NEXT