Night sleep habits and health saam tv
लाईफस्टाईल

Night light exposure cancer risk: रात्री लाईट सुरु ठेवून झोपत असाल तर होईल कॅन्सर; 440 व्होल्टचा झटका देणारं तज्ज्ञांचं नवं संशोधन

Night sleep habits and health: आपण रात्री झोपताना बऱ्याचदा छोटा दिवा, नाईट लॅम्प, किंवा मोबाईल/टीव्हीचा प्रकाश सुरू ठेवतो. पण तुम्हाला माहित आहे का की, तुमच्या या सवयीमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो?

Surabhi Jayashree Jagdish

आपली झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहे, हे आपल्याला माहीत आहेच. पण एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहीत नसेल ती म्हणजे संपूर्ण अंधारात झोपल्याने तुमची झोपच चांगली होत नाही, तर तुम्हाला कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासूनही वाचवलं जाऊ शकतं.

ही गोष्ट फक्त समज-गैरसमज नाही, तर अनेक वैज्ञानिक संशोधनांनी सिद्ध केलेला एक महत्त्वाचा सत्य आहे. तज्ज्ञांनी नेमकं काय संशोधन केलंय आणि त्यातून काय बाबी समोर आल्या आहेत ते पाहूयात.

आपल्या शरीरात एक नैसर्गिक बायोलॉजिकल घड्याळ असतं, ज्याला सर्केडियन रिदम म्हणतात. हे घड्याळ आपल्याला कोणत्या वेळेस झोपायचं, उठायचं, हार्मोन तयार करायचं, पेशी दुरुस्त करायच्या हे सगळं ठरवत असतं. पण जर आपण झोपताना खोलीत लाईट चालू ठेवला, अगदी छोटा नाईट लॅम्प जरी चालू ठेवला तरी, आपल्या मेंदूला गोंधळ होतो. यावेळी बाहेर रात्र आहे की दिवस यामध्ये मेंदूचा गोंधळ होतो.

मेलाटोनिन हार्मोनचं काम

मेलाटोनिन हे हार्मोन रात्री अंधारात शरीरात तयार होतं. यालाच "स्लीप हार्मोन" असंही म्हणतात. पण त्याचं काम फक्त झोपेचं नाही. मेलाटोनिन हा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट देखील आहे. ते आपल्या शरीरात तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सला रोखतो. हे फ्री रॅडिकल्स आपल्या डीएनएला इजा करून कॅन्सर पेशींची निर्मिती करू शकतात.

पण जर तुम्ही रात्री लाईटमध्ये झोपता, तर मेलाटोनिनचं उत्पादन कमी होतं आणि शरीराची नैसर्गिक कॅन्सरविरोधी सुरक्षा कमजोर होऊ शकते

वैज्ञानिक काय म्हणतात?

  • Cancer Causes & Control या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका स्टडीमध्ये असं आढळलं की, रात्री पूर्ण अंधारात न झोपणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो.

  • युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या संशोधनात असं सिद्ध झालं की, मेलाटोनिन ब्रेस्ट आणि कोलन कॅन्सर पेशींची वाढ थांबवू शकतो.

  • Chronobiology International मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, ज्यांच्या शरीरात मेलाटोनिन रात्री कमी तयार होतो, त्यांना विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका अधिक असतो.

रात्री अंधारात झोपल्याचे इतर फायदे

  • झोपेची गुणवत्ता चांगली होते

  • उठल्यावर फ्रेश वाटतं

  • तणाव आणि नैराश्य कमी होतं

  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

  • हार्मोन संतुलन सुधारतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

Crime: विद्यार्थ्यावर कधी कार, तर कधी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अत्याचार, गोळ्याही द्यायची; मुंबईतील शिक्षिकेचे धक्कादायक कारनामे उघड

Maharashtra Live News Update: बदलापुरात आमदार किसन कथोरेंच्या घराबाहेरील रस्त्यावर गोळीबार

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

SCROLL FOR NEXT