sleep  Saam Tv
लाईफस्टाईल

Steps to better Sleep : दिवसभर थकलेले असतानाही रात्री झोप येत नाही? ५ टिप्स फॉलो करा

Steps to better Sleep in Marathi : अनेक जण दिवसभर थकलेले असतानाही झोप येत नाही. कामाचा तणाव, कुटुंबाच्या जबाबदारी, मोबाईल-टीव्हीचा अधिक वापर यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं.

Vishal Gangurde

Steps to better sleep :

अनेक जण दिवसभर थकलेले असतानाही झोप येत नाही. कामाचा तणाव, कुटुंबाच्या जबाबदारी, मोबाईल-टीव्हीचा अधिक वापर यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. तसेच तुमच्या झोपेवरही परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला शांत झोपायचं असेल, तर तुम्ही ५ टिप्स फॉलो करा.

तुमच्या झोपेत अडथळा येत असेल तर तुमच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. तुमच्या वाईट सवयी झोपेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र, तुम्ही चांगल्या सवयी अंगिकारल्या तर तुम्ही झोपेवर नियंत्रण मिळवू शकता.

व्यवस्थित अंथरूण

नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या एका रिव्ह्यूनुसार, जे लोक प्रतिदिन अंथरुण व्यवस्थित ठेवतात. त्यांना गाढ झोप लागते. त्यांना चांगली झोप लागण्याची क्षमता १९ टक्के असते. त्यांचं आरोग्यही व्यवस्थित राहतं. अमेरिकेच्या सेंट लॉरेंस युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार अस्वच्छ बेडरुममध्ये झोपल्याने व्यक्तीला एंग्जाइटी होते.

स्वच्छ चादरी

चादरी विषयी बोलायचा झालं तर, तुम्ही आठवड्यातून एकदा उशी, चादर धुवायला पाहिजे. तुम्हाला दमा, धुळीचा त्रासापासून एलर्जी असेल तर तुम्ही काळजी घ्यायला हवी. तेव्हा तुम्हाला चांगली झोप येईल.

झोपण्याच्या वेळी मोबाईल वापरू नका

संशोधनानुसार, तुम्ही झोपेच्या वेळी ब्लू लाइटच्या संपर्कात राहिलात तर तुमच्या झोपेत अडथळा येतो. झोपण्याच्या दीड तास आधी मोबाईल, लॅपटॉप यांपासून दूर राहा.

दिवसा कमी झोप घ्या

तुम्हाला रात्री गाढ झोप हवी असेल तर , तुम्ही दुपारच्या सुमारास एका तासापेक्षा अधिक झोपू नका. तुम्ही रात्रभर काम करत असाल, तर तुम्ही सकाळी व्यवस्थित झोप घेणे गरजेचे आहे.

शारिरीक व्यायाम करा

तुम्ही दररोज शारीरिक व्यायाम केल्याने चांगली झोप मिळू शकते. मात्र, झोपण्याच्या आधी जास्त मेहनतीचा व्यायाम करू नये.

Maharashtra News Live Update: पुणे मेट्रो लाईन-३ चे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण

Tuesday Horoscope: आनंदात दिवस जाईल! 5 राशींच्या व्यक्तींच्या पैशाच्या समस्या होतील कमी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT