Skin Care  Saam TV
लाईफस्टाईल

Skin Care : चेहऱ्यावरील अ‍ॅकने आणि पिंपल्स मिनिटांत होतील गायब; ट्राय करा कडुलिंबाच्या पाल्याचा 'हा' रामबाण उपाय

Skin Care Tips : कडू लिंबाची पाने कितीही कडू असली तरी त्यामध्ये असलेले गुण अगदीच गोड आहेत. कडुलिंबाच्या पानांचा आपल्या आहारात समावेश केल्यास विवध आजारावर मात मिळवता येते.

Ruchika Jadhav

कडुलिंबाच्या झाडांच्या पानांचा रस फारच जास्त कडू असतो. त्यामुळे याची चव कुणालाही आवडत नाही. याच्या कडवट चवीची फक्त कल्पना केली तरी जीभ कडू झाल्यासारखी वाटते. आता कडू लिंबाची पाने कितीही कडू असली तरी त्यामध्ये असलेले गुण अगदीच गोड आहेत. कडुलिंबाच्या पानांचा आपल्या आहारात समावेश केल्यास विवध आजारावर मात मिळवता येते. शिवाय स्किन केअरसाठी देखील कडुलिंबाच्या पानांचा उपयोग आहे.

कडुलिंबाच्या पानांचा फेसपॅक

अनेक व्यक्तींच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग असतात. त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. किती विविध ब्रॅण्डचे प्रोडक्ट वापरले तरी फरक पडत नसेल तर तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा फेसपॅक वापरून पहावा.

कसा बनवा घरच्या घरी फेसपॅक

फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी कडुलिंबाच्या झाडाची कोवळी पाने घेऊन या. ही पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ही पाने मिक्सरला बारीक करून घ्या. पुढे यात थोडे पाणी मिक्स करा आणि जाडसर पेस्ट बनवून घ्या. फेस पॅकमध्ये गुलाब जल देखील मिक्स करा. त्याने चेहऱ्याला मस्त ग्लो येतो.

आता ही पेस्ट चेहऱ्यावर अप्लाय करा. पेस्ट चेहऱ्यावर लावल्यावर ती काही वेळ अशीच राहू द्या. त्यानंतर पेस्ट सुकली की ओल्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब करा आणि चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. या स्टेप फॉलो केल्याने तुमच्या चेहऱ्यावर सुंदर आणि मस्त ग्लो येईल.

चारकोल फेसपॅक

चारकोल म्हणजेच कोळसा. आता कोळसा जरी काळा असला तरी त्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही कोळशाचा बारीक चुरा करून घ्या. यासाठी मिक्सरला देखील अगदी बारीक पेस्ट बनवून घेऊ शकता.

या पेस्टमध्ये गुलाब जल आणि मध मिक्स करा. गुलाबजल आणि मध मिक्स केल्याने पेस्ट आणखी सॉफ्ट होते. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर चेहरा नीट सुकू द्या. चेहरा सुकल्यावर थंड नाही तर कोमट पाण्याने फेस वॉश करा. स्किन केअरसाठी दिलेल्या या टिप्स अगदी रामबाण आहेत. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर याचा कोणताही चुकीचा परिणाम होत नाही.

टीप : ही सामान्य माहिती आहे. या माहितीचा आम्ही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

SCROLL FOR NEXT