ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. मात्र त्यात चेहऱ्याची विशेष अशी काळजी घेणे आवश्यक असते.
पावसाळ्याच्या दिवसात वातावरणातील आर्द्रतामुळे अनेकदा त्वचा निस्तेज दिसू लागते त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
चला तर आज जाणून घेऊयात पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घेऊ शकता.
कायम रात्री झोपण्याने पुरवी हलक्या गरम पाण्याने चेहरा धुणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल तसेच घाण काढून टाकण्यासाठी जेंटल क्लिन्झरचा वापर तुम्ही करु शकता.
पावसाळ्यात चेहरा हायड्रेट राहण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझेशनचा वापर करावा
उन्हाळा किंवा पावसाळ्याच्या दिवसात चेहरा चांगला राहण्यासाठी सनस्क्रिमचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.