Skin Care Saam TV
लाईफस्टाईल

Skin Care : त्वचेवरील 'या' बदलांवरून समजतं तुम्हाला कोणता आजार आहे; लक्षणे दिसताच रुग्णालयात धाव घ्या

Serious Disease Seen on Skin : त्वचेवर असे बदल दिसल्यास आपल्याला कोणता आजार झाला आहे हे लगेचच समजते.

Ruchika Jadhav

आपली त्वचा आपल्या शरीराचे रक्षण करते. शरीरातील सर्व अवयवांवर त्वचेचं एक सुंदर आवरण असतं. त्वचा आपल्या शरीरातील प्रत्येक बदलावर रिअॅक्ट होते. पाणी कमी पिल्यास किंवा पोट साफ होत नसल्यास कपाळावर पिंपल्स येतात. आपल्याला एखादी गोष्ट विलक्षणीय वाटल्यास आपण घाबरल्यास त्वचेवरील केस उभे राहतात. त्याला अंगावर काटा येणे, शहारे येणे असंही म्हणतात.

तुम्हाला माहितीये का? आपली त्वचा आपल्या शरीरातील विविध बदलांचे संकेत देखील देते. आरोग्याशी संबंधित विविध समस्यांवर त्वचा रिअॅक्ट होते. किंवा या बदलांचा परिणाम त्वचेवर लगेचच दिसून येतो. त्यामुळे आज आपण त्वचेवर कोणता बदल दिसल्यास काय करावे आणि काय करू नये याची माहिती जाणून घेणार आहोत.

न्यूरोलॉजीस्ट डॉक्टर आणि हेल्थ एक्सपोर्ट डॉ. प्रियांका सहरावत यांनी या बाबत अधिक माहिती दिली आहे. त्वचेवर कोणती लक्षणे दिसल्यास काय होतं हे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

विटॅमीन बी १२ ची कमतरता

आपल्या हातांच्या बोटांवर हडांमध्ये जॉइंड असतात. या जागी असलेली स्किन फारच मऊ असते. काही व्यक्तींची हातांवर हडांमध्ये स्किन काळी पडलेली दिसते. डॉक्टरांनी यावर सांगितलं आहे की, येथील त्वचा काळी पडली असेल तर शरीरात बी १२ ची कमतरता असते.

मेटाबॉलिक सिंड्रोम

काही व्यक्तींच्या मानेचा रंग काळा पडतो. मानेवर आधी लाल रॅशेस दिसतात. त्यानंतर मान हळूहळू काळी पडू लागते. मान काळी कडणे फार खराब दिसते. मात्र असे होणे म्हणजे एब्डोमिनल ऑबेसिटी, ओवरवेट, हाय ब्लड प्रेशर, हाय ब्लड शुगर, हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे आहेत.

त्वचेचा कर्करोग

आपली त्वचा फार सेंसिटीव्ह असते. काही व्यक्तींच्या त्वचेवर रॅशेस येणे, स्किनवर सतत एकसारख्या पॅटनमध्ये डाग उमटणे यावर उपचार करून त्याचे वेळीच निदान झाले नाही तर पुढे त्वचेचा कॅन्सर उद्भवण्याची देखील शक्यता असते.

डेंग्यू

जर तुम्हाला सतत ताप येत आहे आणि त्वचेवर काही रॅशेस आहेत. असे असेल तर तुम्हाला डेंग्यूची लागण झाल्याचं समजतं. अशावेळी तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT