Warning signs of a heart attack saam tv
लाईफस्टाईल

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Warning signs of a heart attack: हार्ट ब्लॉकेज ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे, ज्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. धमण्यांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे रक्ताभिसरण थांबते, ज्यामुळे हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.

Surabhi Jayashree Jagdish

  • हृदय ब्लॉकेजमध्ये छातीत जडपणा जाणवतो.

  • श्वास घेण्यात अडचण हृदयाच्या समस्येचे लक्षण आहे.

  • सतत थकवा जाणवणे हे हृदय ब्लॉकेजचे लक्षण आहे.

आपल्या शरीरातील हृदय हे एक प्रकारचं इंजिन आहे. हृदय आपल्या शरीरातील सतत रक्त पंप करतं आणि आपल्याला जिवंत ठेवतं. मात्र हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला, तर तो मोठा धोका ठरू शकतो.

हृदय ब्लॉकेज म्हणजे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा येणं. ही समस्या हळूहळू वाढत जाते. मात्र पण शरीर काही लक्षणांद्वारे वेळेत इशारा देतं. ही लक्षणं ओळखून आपण हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाच्या इतर समस्या टाळता येऊ शकतात. ही लक्षणं कोणती आहेत ती जाणून घेऊया.

छातीत वेदना व जडपणा

छातीत अधूनमधून दडपण जाणवणं, जळजळ होणं किंवा जडपणा वाटणं हे हृदय ब्लॉकेजचं सर्वात सामान्य लक्षण आहे. याला वैद्यकीय भाषेत एंजायना म्हटलं जातं. ही वेदना कधी कधी खांदा, हात किंवा पाठीपर्यंत पसरते. अशी लक्षणं वारंवार जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांकडे तपासणी करणं आवश्यक आहे.

श्वास घ्यायला त्रास

थोडंसं चालल्यानंतर किंवा जिना चढल्यानंतर जर श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर ते हृदयाच्या ब्लॉकेजचे संकेत असू शकतात. ब्लॉकेजमुळे हृदयापर्यंत पुरेशी ऑक्सिजन पोहोचत नाही, त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते.

सतत थकवा आणि अशक्तपणा

जास्त काम न करता देखील दिवसभर थकवा जाणवणं, नीट झोप झाल्यानंतरही अशक्तपणा राहणं ही देखील हृदय ब्लॉकेजची लक्षणं आहेत. धमन्यांमध्ये अडथळा आल्यामुळे शरीराला पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे सतत थकल्यासारखं वाटतं.

चक्कर येणं व बेशुद्ध होणं

हृदय ब्लॉकेजमुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मेंदूपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही. परिणामी चक्कर येणं, डोकं हलकं वाटणं किंवा कधी कधी बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसू शकतात. ही साधी कमजोरी समजून दुर्लक्ष करू नये.

पाय सुजणं

हृदय नीट काम करत नसेल तर शरीरात द्रव साचायला लागतो. त्यामुळे पाय, घोटे आणि पंजे सुजू शकतात. हे लक्षण हृदय ब्लॉकेजसोबतच हृदयविकाराचा इशाराही असू शकतो.

जास्त प्रमाणात घाम येणं

उन्हाळा किंवा व्यायामाशिवायही वारंवार जास्त घाम येणं हेही हृदय ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं. ब्लॉकेजमुळे हृदयावर ताण येतो आणि त्यामुळे शरीर जास्त घाम गाळतं. विशेषतः छातीत वेदना होत असताना जास्त घाम येणं हे देखील गंभीर लक्षण आहे.

हृदय ब्लॉकेजचे सर्वात सामान्य लक्षण कोणते?

छातीत वेदना, दडपण किंवा जडपणा हे सर्वात सामान्य लक्षण आहे.

श्वास घेण्यात त्रास होण्याचे मुख्य कारण काय असू शकते?

हृदयाच्या ब्लॉकेजमुळे ऑक्सिजनची कमतरता भासते, त्यामुळे श्वास घेण्यात त्रास होतो.

सतत थकवा जाणवण्यामागील कारण काय आहे?

रक्त आणि ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे सतत थकवा जाणवतो.

चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे कोणत्या आजाराचा इशारा असू शकते?

हृदय ब्लॉकेजमुळे रक्तप्रवाह कमी होऊन चक्कर येते.

पाय सुजण्याचे वैद्यकीय कारण काय आहे?

हृदयाचे कार्य अक्षम झाल्यामुळे शरीरात द्रव साचतो आणि पाय सुजतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत आशिया कपच्या प्राइज मनीपेक्षा ८ पट जास्त; किंमत ऐकून बसेल धक्का

Mumbai Crime: साहेब मला अटक करा मी..., बहिणीच्या बॉयफ्रेंडची हत्या करून आरोपी पोलिस ठाण्यात गेला; मुंबई हादरली

Kunkeshwar Temple : कोकण दर्शनात ‘कुणकेश्वर मंदिर’ ठरेल ट्रिपसाठी खास; वाचा नव्या डेस्टिनेशनचे वैशिष्ट्य

Jio Recharge Offer: बल्ले-बल्ले! जिओ दररोज देणार फ्री २.५ GB डेटा अन् ओटीटी सबस्क्रिप्शन फ्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसाला मारहाण, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून ओढत नेलं अन्...

SCROLL FOR NEXT