High cholesterol saam tv
लाईफस्टाईल

High cholesterol: फक्त आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश; रक्तावाहिन्यांमध्ये साचलेली चरबी लगेच निघून जाईल

Cholesterol lowering foods: हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांसोबत संतुलित आहारही महत्त्वाचा आहे. ओट्स, अक्रोड, लसूण, ग्रीन टी आणि जवसाच्या बिया यांसारख्या पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास LDL कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्याला मदत होऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल हाय कोलेस्ट्रॉलची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. चुकीच्या आहाराच्या सवयी, तेलकट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाणं आणि शारीरिक हालचाल कमी असणं यामुळे शरीरातील खराब म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. कोलेस्ट्रॉलची पातळी दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेत असतानाच योग्य आहार घेणंही महत्त्वाचं आहे. डॉक्टर शुभम वत्स यांच्या मते, आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

ओट्स

कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी ओट्स हा आहारातील चांगला पर्याय मानला जातो. त्यामध्ये बीटा-ग्लुकॉन नावाचं फायबर असतं. हे फायबर पचनसंस्थेत गेल्यानंतर कोलेस्ट्रॉलला एकत्रिक ठेवण्यास मदत करतो. त्यानंतर हे कोलेस्ट्रॉल मलावाटे शरीरातून बाहेर जाण्यास मदत होते. बाजारात मिळणारे फ्लेवर्ड ओट्स घेण्याऐवजी स्टील-कट किंवा रोल्ड ओट्स निवडणं योग्य आहे.

अक्रोड

सुकामेव्यामध्ये अक्रोड हृदयाच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर मानला जातो. अक्रोडमध्ये वनस्पतीजन्य ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात अक्रोड आहारात घेतल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

लसूण

कच्च्या लसणामध्ये अॅलिसिन नावाचा सल्फरयुक्त घटक आढळतं. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत करू शकतं. त्यामुळे आहारात लसणाचा योग्य प्रमाणात समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. कच्चा लसूण रिकाम्या पोटी खाणं सर्वात फायदेशीर मानलं जातं.

ग्रीन टी

ग्रीन टीचा समावेश वजन नियंत्रणासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठीही केला जाऊ शकतो. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझमला मदत मिळू शकते आणि वजन नियंत्रणात ठेवणं सोपं होतं. त्याचबरोबर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही ग्रीन टी काही प्रमाणात मदत करू शकते.

जवसाच्या बिया

हृदयाच्या आरोग्यासाठी ओमेगा-३ फॅटी अॅसिड महत्त्वाचं असतं. जवसाच्या बियांमध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड म्हणजेच ALA नावाचं ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. हे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतं. तसंच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही त्याचा फायदा होऊ शकतो.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

SCROLL FOR NEXT