High cholesterol: नसांमध्ये चिकटलेलं कोलेस्ट्रॉल लगेच वितळेल, फक्त आहारात या 1 उकडलेल्या भाजीचा करा समावेश

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल वाढल्यास काय होतं

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएलचं प्रमाण वाढल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकतं. त्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होऊन हृदयाच्या आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

LDL cholesterol | saam tv

फायबरयुक्त आहार

फायबरयुक्त पदार्थ शरीरातील कोलेस्ट्रॉलचं मॅनजमेंट करण्यास करण्यास मदत करू शकतात. विशेषतः सॉल्युबल फायबर कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर सकारात्मक परिणाम करू शकतात. यामुळे आहारात भाज्या आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

soluble fiber | saam tv

ही भाजी नेमकी कोणती?

ही भाजी म्हणजे भेंडी...जी भारतीय स्वयंपाकघरात नेहमी वापरली जाते. इंग्रजीमध्ये भेंडीला ओक्रा म्हणजेच Okra असं म्हटलं जातं. भेंडीमध्ये सॉल्युबल फायबर आणि अनेक पोषक घटक असल्याने ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

okra benefits | saam tv

भेंडीतील चिकट पदार्थाचा होतो फायदा

भेंडीमध्ये म्यूसीलेज नावाचा नैसर्गिक चिकट पदार्थ आढळतो. हा एक प्रकारचा सॉल्युबल फायबर असून पचनसंस्थेमध्ये कोलेस्ट्रॉलशी बांधलं जाण्यास मदत करतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होऊ शकते.

cholesterol management | saam tv

बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते

भेंडीतील सॉल्युबल फायबर शरीरातील फॅटचं शोषण नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. नियमित संतुलित आहारात भेंडीचा समावेश केल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो.

vegetables for cholesterol | saam tv

अँटिऑक्सिडंट्स

भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फोलेटसारखे पोषक घटक असतात. यासोबतच पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजेही भेंडीमध्ये आढळतात. हे पोषक घटक शरीराच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतात.

okra nutrition | saam tv

उकडलेली भेंडी

४ ते ५ भेंडी स्वच्छ धुऊन तिचे छोटे तुकडे करून पाण्यात रात्रभर भिजवून ठेवता येते. सकाळी ही भेंडी ५ ते १० मिनिटं उकडून तिचं सेवन करू शकता. काही लोक उकडलेल्या भेंडीचं पाणीही पितात तसंच नियमित सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

okra for heart health | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

vitamins in okra | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

magnesium rich foods | saam tv
येथे क्लिक करा