Surabhi Jayashree Jagdish
नाभीवर एरंडेल तेल लावल्याने पोटाच्या आसपासच्या भागाला आराम मिळू शकतो. त्यामुळे गॅस आणि अपचनासारख्या समस्यांमध्ये फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने मसाज केल्यानेही आरामदायी वाटू शकते.
एरंडेल तेलाचा वापर पारंपरिकरित्या बद्धकोष्ठतेसाठी केला जातो. नाभीवर एरंडेल तेल लावल्याने बद्धकोष्ठतेच्या त्रासात आराम मिळू शकतो. मात्र, नाभीवर तेल लावल्याने बद्धकोष्ठता दूर होते याचे ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.
एरंडेल तेलामध्ये त्वचेला मॉइश्चर देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे नाभीच्या आसपासची कोरडी त्वचा मऊ आणि मॉइश्चराइज होण्यास मदत होऊ शकते. नियमित वापर करण्यापूर्वी त्वचेवर अॅलर्जी किंवा जळजळ होत नाही ना, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
नाभीवर एरंडेल तेल लावून हलका मसाज केल्याने शरीराला आराम मिळू शकतो. शरीर रिलॅक्स झाल्यामुळे झोपण्यास मदत होऊ शकते. मात्र एरंडेल तेल नाभीवर लावल्याने झोपेची गुणवत्ता निश्चितच सुधारते.
रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर तेल लावून हलका मसाज केल्याने शरीराला आराम मिळू शकतो. मसाजमुळे मन शांत होण्यास आणि दिवसभराचा थकवा कमी झाल्यासारखं वाटण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे झोपण्यापूर्वी रिलॅक्स होण्यासाठी हा उपाय काहीजण वापरतात.
मासिक पाळीदरम्यान अनेक महिलांना पोटदुखीचा त्रास होतो. नाभीवर एरंडेल तेल लावल्याने या त्रासात आराम मिळू शकतो. मात्र मासिक पाळीच्या वेदनांवर हा निश्चित उपचार आहे असं मानण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.
एरंडेल तेल त्वचेला ओलावा देण्यास मदत करू शकते. त्यामुळे नाभीच्या आसपासची त्वचा कोरडी असल्यास ती मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत होऊ शकते. त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा जळजळ जाणवल्यास तेलाचा वापर त्वरित थांबवावा.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.