Simple One electric scooter deliveries start in India: इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्ट-अप सिंपल एनर्जीने गेल्या महिन्यात देशात आपली धनसू इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली होती. कंपनीने ही EV 1.45 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) प्रारंभिक किंमतीत लॉन्च केली आहे.
लॉन्च केल्यानंतर काही दिवसांनी कंपनीने वन इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू केली आहे. सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर बेंगळुरूमधील ग्राहकांच्या पहिल्या ग्रुपला देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ईव्हीची डिलिव्हरी लवकरच इतर शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होईल.
सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरचे पहिल्यांदा ऑगस्ट 2021 मध्ये सादर करण्यात आली होती. कंपनीने आपली ही स्कूटर रोल आऊट करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा कमी वेळ घेतला होता. आतापर्यंत एक लाखाहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. सिंपल वनने तामिळनाडूमध्ये वार्षिक 10 लाख युनिट्सच्या उत्पादन क्षमतेसह एक प्लांट उभारला आहे. (Latest Marathi News)
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 5kWh चा बॅटरी पॅक उपलब्ध आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये मुंबई ते पुणे गाठू शकते. हिची रेंज 212 किमी असल्याचा कंपनीचा दावा आहे. याची PMS मोटर 11.3bhp पॉवर आणि 72Nm पीक टॉर्क जनरेट करते. सिंपल वन ही सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे, जी 2.77 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग पकडते. हिचा वेग 105 किमी प्रतितास आहे. (Latest Auto News in Marathi)
ही स्कूटर 750 वॅट चार्जरसह येते. ही 5 तास 54 मिनिटांत चार्जरसह 0-80 टक्के चार्ज केली जाऊ शकते. सिंपल एनर्जी भविष्यात 160-180 डीलरशिपद्वारे 40-50 शहरांमध्ये विक्री वाढवण्याची योजना आखत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.