Sachin Tendulkar Car Collection: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कारची खूप आवड आहे. यामुळेच त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक जबरदस्त गाड्यांचा समावेश आहे. आता सचिन तेंडुलकरच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका शानदार लक्झरी कारची भर पडली आहे. सचिनने नुकतीच Lamborghini Urus S विकत घेतली आहे. ही कार आपल्या खास फीसचर्समुळे जगभरात लोकप्रिय आहे.
याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Lamborghini Urus S ची किंमत 4.18 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. सचिन तेंडुलकरची Lamborghini Urus S अनेक उत्कृष्ट फीचर्सने सुसज्ज आहे. (Latest Marathi News)
तेंडुलकरच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचे तर, त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचा कलेक्शन आहे. सचिनकडे BMW 7-Series Li, BMW X5M, BMW i8, आणि BMW 5-Series ची नवीन मॉडेल्स आहेत. बीएमडब्ल्यूचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्यापूर्वीच सचिनने बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या होत्या.
सचिन व्यतिरिक्त रोहित शर्माकडे Lamborghini Urus S कार आहे. ही कार 190 mph वेगाने धावण्यास सक्षम आहे. ही कार केवळ 3.5 सेकंदात 0 ते 60 मैल प्रतितास वेग पकडते.
विराट कोहलीने 2018 मध्ये बेंटले कॉन्टिनेंटल जीटी खरेदी केली होती. ही आलिशान स्पोर्ट्स कार देशातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे. ज्याची किंमती 3.29 कोटी ते 4.04 कोटी रुपये आहेत. (Latest Auto News in Marathi)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.