जर व्यक्तीला जास्त चालण्याची धावपळ करण्याची सवय नसेल तर ती व्यक्ती कोणत्याही कामाने लगेच थकते. अशावेळेस त्याच्या रक्तदाबावर थेट परिणाम होतो. जेव्हा रक्त दाबाचा आकडा वाढतो तेव्हा पुर्व सुचना किंवा संकेत शरीर नाही. ही लक्षणे ओळखणं फार कठीण असतं. कारण रक्त दाब हा आपल्या दैनंदिन शरीराच्या हालचालीवरून कमी जास्त होत असतो. पुढे तज्ज्ञांनी दिलेल्या सुचनांनुसार काही लक्षणे ओळखल्याने तुम्हाला उच्च रक्तदाबाचा धोका टाळता येऊ शकतो.
उच्च रक्त दाबाची लक्षणे शरीर ठळकपणे जाणवू देत नाही. गुपचूप शरीरात होणाऱ्या बदलांमधून ती ओळखायची असतात. हाय ब्लड प्रेशर म्हणजे, रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब सातत्याने जास्त राहणं म्हणजे उच्च रक्तदाब. यामुळे तुमच्या हृदयावर, मेंदूवर, किडनीवर आणि डोळ्यांवर खूप ताण येतो.
भारतात जवळपास प्रत्येक चारपैकी एक व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. मात्र त्यातील निम्म्याहून अधिक लोकांना आपल्याला हा आजार आहे याची कल्पनाच नसते, ही सर्वात धक्कादायक बाब आहे.
अनेकांना वाटतं की डोकेदुखी, चक्कर किंवा अशक्तपणा नसेल तर बीपी ठीकच असणार. मात्र ही सर्वात मोठी चूक असते. स्ट्रोक, हार्ट अटॅक किंवा किडनी निकामी झाल्यानंतरच आपल्याला उच्च रक्तदाब असल्याचं समजतं हाही गैरसमज आहे.
शहरांमध्ये हळूहळू आरोग्य तपासण्यांची सवय वाढत असली, तरी ग्रामीण आणि निमशहरी भागात अजूनही स्वस्त आणि नियमित बीपी तपासणीची सुविधा अपुरी आहे. दुसरीकडे, तरुण वर्ग हा आजार वयस्कर लोकांचा आहे, असा गैरसमज करून दुर्लक्ष करतो. मात्र वाढता ताणतणाव, जंक फूड, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप यामुळे 40 वर्षांखालील लोकांमध्येही उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे.
उच्च रक्तदाबाला 'सायलेंट किलर' म्हटलं जातं, कारण तो बहुतेक वेळा कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाही. तरीही काही सूक्ष्म संकेत शरीर देत असतं. वारंवार होणारी सकाळची डोकेदुखी, धूसर दिसणं, अचानक लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं, कोणतीही इजा नसताना नाकातून रक्त येणं, कारण नसताना जास्त थकवा किंवा गोंधळल्यासारखं वाटणं, हृदयाची धडधड अनियमित होणं, साध्या कामातही धाप लागणं किंवा कानात सतत घंटीचा आवाज येणं ही लक्षणे वारंवार जाणवत असतील, तर वय काहीही असो, तपासणी करणं गरजेचं आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.