BP Control: BP च्या गोळ्या घेण्यापूर्वी काय काळजी घ्याल? डॉ. रवी गोडसेंनी दिल्या महत्वाच्या टिप्स, एकदा वाचाच

Hypertension Care: बीपीच्या गोळ्या घेण्याआधी काही महत्त्वाचे नियम पाळल्यास रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो. डॉक्टर रवी गोडसेंनी दिलेल्या सोप्या पण प्रभावी टिप्स जाणून घ्या.
bp tablets precautions
blood pressure medicinessaam tv
Published On

उच्च रक्तदाबाच्या समस्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. अमेरिकेत सुमारे २.५ कोटी प्रौढांमध्ये बीपीचा त्रास सुरु आहे. सामान्य रक्तदाब रीडिंग १२० ते ८० मिमी मर्क्युरी किंवा त्यापेक्षा कमी असतो. तर हाय आकडा सिस्टोलिक १२० पेक्षा कमी आणि खालचा आकडा ८० पेक्षा कमी असावा लागतो. या आकड्याचे प्रमाण वाढले तर अनेक जण गोळ्या घेतात. मात्र काही केल्या त्यांना आराम मिळत नाही. अशावेळेस आपण गोळ्या घेण्याआधी काही नियम पाळावे लागतात. त्याने तुमचा बीपी कंट्रोलमध्ये येण्यास मदत होईल.

तज्ज्ञ डॉक्टर रवी गोडसे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर बीपीच्या गोळ्या घेण्याआधी काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत. डॉक्टर म्हणतात, '' ब्लड प्रेशरच्या गोळ्या या जीवन विम्यासारख्या असतात. त्यामुळे त्या घेताना योग्य वेळी आणि काही नियम पाळून घेतल्या पाहिजेत. याने तुम्ही ब्लड प्रेशरची समस्या नाहीशी होऊ शकते.''

bp tablets precautions
Liver Cancer Symptoms: लिव्हर कॅन्सर झालास शरीराच्या 'या' बाजूस होतात वेदना, तज्ज्ञांनी दिली महत्वाची टीप

त्यामध्ये सर्वप्रथम गोळ्या खाण्याआधी एका शांत जागी बसायला सांगितले आहे. गोळ्या घेण्याआधी चहा, कॉफीचे किंवा इतर पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. मग पहिल्यांदा ब्लड प्रेशर तपासाचे पण याचे आकडे पाहायचे नाहीत. मग एका जागी शांत बसल्यावर कोणाशीही न बोलता दुसऱ्यांदा रिडींग तपासावी. याने तुम्हाला मोठ्या प्रमाणात फरक जाणवू शकतो.

ब्लड प्रेशर तपासताना एका जागी शांत बसून आणि पाय जमिनीला टेकवून बसले पाहिजे. ही सगळी तपासणी तुम्ही घरच्याघरी करून पाहू शकता. दोनदा ब्लड प्रेशर तपासणं यामध्ये गरजेचे आहे. पहिल्यांदा तपासलेले रिडींगचे आकडे यामध्ये पाहणे टाळले पाहिजे. याने तुम्हाला लवकरात लवकर बीपी नियंत्रणात करता येईल. आकडा वाढलेला असेल तर गोंधळून, घाबरून न जाता शांत डोक्याने त्यावर उपचार घेऊन तुम्ही पुर्णपणे बरे होऊ शकता, अशी खात्री बाळगली पाहिजे.

bp tablets precautions
Green Chilli Halwa: हिरव्या मिरचीचा हलवा कधी खाल्लाय का? अंकिता लोखंडेने शेअर केली खास रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com