Green Chilli Halwa: हिरव्या मिरचीचा हलवा कधी खाल्लाय का? अंकिता लोखंडेने शेअर केली खास रेसिपी

Viral Halwa Recipe: अंकिता लोखंडेने शेअर केलेली हिरव्या मिरचीच्या हलव्याची अनोखी रेसिपी सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून आयुर्वेदिक फायदेही देते.
Viral Halwa Recipe
Green Chilli Halwa Recipegoogle
Published On

कधी ऐकलं आहे का हिरव्या मिरचीचा हलवा बनवला जातो? ऐकायलाच नाही तर विचारायलाही विचित्र वाटणारी ही रेसिपी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पिझ्झावर पाइनॅपल, सँडविचमध्ये चॉकलेट, बिस्किटांचा मिल्कशेक असे अनेक अजब फूड एक्सपेरिमेंट्स आपण पाहतच असतो. मात्र सध्या प्रत्येकालाच एकच प्रश्न पडला आहे की, हिरव्या मिरचीचा हलवा नेमका कसा बनतो?

या चर्चेचं कारण ठरला आहे कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय शो 'लाफ्टर शेफ'. या शोमध्ये प्रसिद्ध शेफ हरपाल सिंग सोखी यांना इम्प्रेस करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी हटके डिशेस बनवताना दिसतात. याच शोमध्ये अलीकडे हिरव्या मिरचीचा हलवा बनवण्यात आला आणि तो तयार करताना अनेक सेलिब्रिटींचा अक्षरशः घाम निघालाय. कारण मिरचीची मूळ चव तिखट असते, मग त्याच्यापासून गोड डेझर्ट कसं बनवायचं, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला.

Viral Halwa Recipe
Night Shower Benefits: शांत झोप आणि दीर्घायुष्याचं सिक्रेट! रात्री आंघोळ करण्याचे फायदे

शेफ हरपाल सिंग सोखी यांनी सांगितलेल्या या खास रेसिपीमध्ये एक महत्त्वाचं सीक्रेट आहे, ज्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो पण तिचे औषधी गुण कायम राहतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा हलवा खूप फायदेशीर मानला जातो. सायनसचा त्रास, डोकेदुखी किंवा पचनाच्या समस्या असतील तर हा हलवा उपयोगी ठरतो. मिरचीमुळे पोटात रक्तपुरवठा वाढतो आणि पचनक्रियेला चालना मिळते.

मिरचीचा हलवा बनवताना हलक्या हिरव्या रंगाच्या, कमी तिखट मिरच्या घ्यायच्या. सर्वप्रथम मिरची मधोमध चिरून त्यातील बिया पूर्णपणे काढून टाकायच्या, कारण जास्त तिखटपणा बीयांमध्येच असतो. यानंतर मिरच्या पाण्यात उकळवायच्या. इथेच या रेसिपीचं खास रहस्य दडलेलं आहे. उकळताना पाण्यात थोडी तुरटी टाकली जाते. तुरटीमुळे मिरचीचा तिखटपणा मोठ्या प्रमाणात कमी होतो. ही प्रक्रिया दोन ते तीन मिनिटे केली जाते आणि ती तीन वेळा पुन्हा केली जाते. प्रत्येक वेळी नवीन पाणी आणि तुरटी वापरली जाते. या प्रक्रियेमुळे मिरचीचा रंग बदलतो आणि जीभेला लागणारा तिखटपणा जवळपास नाहीसा होतो, मात्र तिचे पचनासाठी उपयुक्त गुण टिकून राहतात.

उकडलेल्या मिरच्या मिक्सरमध्ये हलक्याशा जाडसर वाटल्या जातात. त्यानंतर कढईत तूप गरम करून त्यात मिरचीची पेस्ट परतली जाते. त्यात रवा घालून चांगलं भाजल्यानंतर साखर टाकली जाते. साखर घालताना गॅस स्लो ठेवावी, जेणेकरून साखर कॅरामलाइज होणार नाही. शेवटी मावा किंवा ड्रायफ्रुट्स घाला आणि वेलची पूड घालून हा हटके हलवा तयार होतो.

Viral Halwa Recipe
Night Shower Benefits: शांत झोप आणि दीर्घायुष्याचं सिक्रेट! रात्री आंघोळ करण्याचे फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com