Sakshi Sunil Jadhav
आरोग्याची काळजी घेण्यासाठी सकाळची आंघोळ जितकी महत्त्वाची आहे, तितकीच रात्री झोपण्याआधीची आंघोळही फायदेशीर ठरते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही रात्रीची आंघोळ फायदेशीर ठरते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
कोमट पाण्याने आंघोळ केल्यावर शरीराचं तापमान हळूहळू कमी होतं, मेंदूला झोपेचा संकेत मिळतो आणि खोल, शांत झोप लागते.
दिवसभराचा ताण, चिंता आणि मानसिक थकवा आंघोळीमुळे कमी होतो. मन शांत होतं आणि रिलॅक्स वाटतं.
दिवसभर घाम, प्रदूषण आणि ब्यूटी प्रॉडक्ट्समुळे त्वचेवर साचलेली घाण व जिवाणू रात्री आंघोळीमुळे दूर होतात. मुरुम, ॲलर्जीचा धोका कमी होतो.
कोमट पाण्याची आंघोळ केल्यास स्नायूंना आराम मिळतो. अंगदुखी, पाठदुखी आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
अभ्यासानुसार, रात्री आंघोळ केल्याने मायग्रेनची तीव्रता कमी होऊ शकते तसेच शरीरावरची सूजही कमी होते.
रात्री आंघोळ केल्याने कोर्टिसोलसारख्या तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं.
चांगली झोप मिळाल्यामुळे शरीराची इम्युनिटी वाढते, आजारांचा धोका कमी होतो.
नियमित आणि दर्जेदार झोपेमुळे हृदयविकार, मधुमेह, तणावजन्य आजारांचा धोका कमी होतो आणि दीर्घ, निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते.