Sakshi Sunil Jadhav
अनेकांना वाटतं की, फक्त हेल्दी खाल्याने ब्लड शुगर आपोआप नियंत्रणात येईल. मात्र प्रत्यक्षात असं घडत नाही. काही लपलेल्या कारणांमुळे गुप्तपणे याचे प्रमाण वाढत असते.
आहारात फळांचा रस, स्मूदी, लो-फॅट पदार्थ किंवा पॅकेज्ड हेल्दी फूडमध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. जे ब्लड शुगर झपाट्याने वाढवतात.
सगळी धान्ये, फळं किंवा ब्राउन राइससारखे हेल्दी पदार्थ एकाच वेळेस खाणे टाळावे. अन्यथा इन्सुलिनवर ताण येऊन शुगर वाढते.
पौष्टीक आहार असूनही शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसेल, तर रक्तातील साखर पेशींमध्ये न जाता रक्तातच साचते. यालाच इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणतात.
काही औषधं, स्टेरॉईड्स, गोळ्या किंवा हार्मोनल औषधे ब्लड शुगर वाढवू शकतात. त्यामुळे आहार योग्य असूनही साखर वाढलेली दिसते.
डिहायड्रेशनमुळे रक्त जास्त घट्ट होतं आणि त्याचा परिणाम ब्लड शुगरवर होतो. पुरेसे पाणी न पिणे हेही साखर वाढण्याचे कारण ठरू शकते.
बसून काम करण्याची सवय, कमी हालचाल आणि नियमित व्यायामाचा अभाव यामुळे स्नायू ग्लुकोज वापरत नाहीत आणि साखर वाढते.
पुरेशी झोप घेत नसाल तर हार्मोन्सचा समतोल बिघडतो, इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि ब्लड शुगर वाढू शकते.
थायरॉईड, हार्मोनल बिघाड, लिव्हर किंवा किडनीशी संबंधित त्रास असल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहत नाही.