Sakshi Sunil Jadhav
हिवाळ्याचा ऋतू आला की गरमागरम हलव्याची मजा काही औरच असते. बहुतेक जण गाजराचा हलवा आवडीने खातात, पण फक्त गाजरच नाही तर भोपळा, पिवळा भोपळा यांसारख्या भाज्यांपासूनही अतिशय टेस्टी आणि हेल्दी हलवा बनवता येतो.
खास म्हणजे या रेसिपींमध्ये मावा घालण्याची अजिबात गरज नाही. तर पाहा या हिवाळ्यात बनवण्यासाठी सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज.
हिवाळ्यात खाल्लेला हलवा शरीराला उष्णता देतो, ऊर्जा वाढवतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. भाज्या आवडत नसणाऱ्या मुलांनाही हा हलवा आवडतो, कारण त्याचा पोत आणि चव अगदी डेझर्टसारखी असते.
किसलेले गाजर, तूप, दूध आणि कंडेन्स्ड मिल्क वापरून अतिशय क्रिमी हलवा तयार होतो.
गाजराचा हलवा दूधात व्यवस्थित शिजवल्यावर काही मिनिटांत घट्ट आणि चविष्ट हलवा तयार होतो.
पिवळ्या भोपळ्याचा हलवा तूप, दूध आणि साखर वापरून अतिशय मऊ, मलईदार तयार होतो.
बदाम, काजू, पिस्ता यामुळे हलवा केवळ चविष्टच नाही तर व्हिटॅमिन ई आणि प्रोटिन्सने समृद्ध होतो.
दोन्ही रेसिपींमध्ये मावा नसल्यामुळे हलवा जड होत नाही आणि पचायला हलका असतो. गाजर आणि भोपळा दोन्ही व्हिटॅमिन A, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असून हिवाळ्यातील आरोग्यासाठी उत्तम असतो.