Sakshi Sunil Jadhav
किडनी हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असून रक्त शुद्ध करणे, विषारी पदार्थ बाहेर काढणे आणि मिनरल्सचे संतुलन राखणे यासाठी तो सतत कार्यरत असतो.
तुम्ही जर काही खाद्यपदार्थ रोजच्या आहारात घेतल्यास किडनीवर ताण येतो आणि दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.
गडद रंगांच्या पेयांमध्ये फॉस्फरसयुक्त अॅडिटिव्हज जास्त प्रमाणात असतात. यांचा अतिरेक किडनीवर अतिरिक्त दबाव टाकून दीर्घकाळात किडनी निकामी होण्याचा धोका वाढवतो.
सॉसेज, हॉट डॉग आणि पॅक्ड मीटमध्ये सोडियम आणि प्रथिने जास्त असतात. जास्त सोडियम आणि प्रथिने किडनीला जास्त काम करायला भाग पाडतात, त्यामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
दूध, दही, चीज यांत फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त असतं. किडनी कमजोर असल्यास हे खनिजे शरीरात जमा होऊन किडनीचे नुकसान वाढवतात.
संत्र्यांमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं. किडनी नीट कार्य करत नसल्यास शरीरातील पोटॅशियम अचानक वाढतं आणि हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका निर्माण होतो.
आरोग्यदायी मानले जाणारे हे ब्रेड पांढऱ्या ब्रेडपेक्षा फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त असते. किडनी समस्या असणाऱ्यांसाठी ते घातक ठरू शकते.
हे खाद्यपदार्थ अति उच्च सोडियमयुक्त असतात. त्यामुळे शरीरात द्रव साचतो, रक्तदाब वाढतो आणि किडनीवर ताण येतो.
दोन्हीमध्ये पोटॅशियम जास्त असते. किडनी कमकुवत असल्यास शरीरातील पोटॅशियम बाहेर न जाण्यामुळे ते रक्तात जमा होऊन किडनीच्या पेशींना नुकसान पोहोचतं.