Sakshi Sunil Jadhav
यशस्वी होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मात्र फक्त कष्ट आणि शिस्त पुरेशी नसते. आचार्य चाणक्य यांनी हजारो वर्षांपूर्वीच सांगितले होते की माणसाची दिनचर्या, विचारसरणी आणि वागणूकच त्याच्या भवितव्याची दिशा ठरवते.
चाणक्य नितीनुसार यशस्वी लोक दैनंदिन आयुष्यात काही वेगळ्या सवयी अंगीकारतात, ज्या सामान्य लोक टाळतात.
चाणक्य नितीत वेळेला सर्वात मोठे धन मानले आहे. यशस्वी लोक प्रत्येक काम ठरावीक वेळेत करतात आणि वेळ वाया घालवत नाहीत.
सकाळचा वेळ पवित्र आणि सकारात्मक मानला जातो. यशस्वी लोक सकाळी उठल्यानंतर आत्मचिंतन, नियोजन आणि मन शांत करण्यासाठी वेळ देतात.
अधिक बोलणारा व्यक्ती अनेकदा स्वतःचे नुकसान करून घेतो. यशस्वी लोक परिस्थिती आणि समोरच्या व्यक्तीनुसारच आपली वाणी वापरतात.
खाणे, झोपणे, काम आणि विश्रांती यामध्ये शिस्त ठेवणे हे यशस्वी लोकांचे वैशिष्ट्य आहे. स्वतः नियम पाळणाऱ्यालाच समाजात सन्मान मिळतो.
नकारात्मक विचार करणारे किंवा वेळ वाया घालवणारे लोक यशात अडथळा ठरतात. त्यामुळे यशस्वी लोक नेहमी योग्य संगत निवडतात.
ज्ञान हे असे धन आहे जे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. यशस्वी लोक रोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय ठेवतात.
क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. यशस्वी लोक रागाच्या भरात निर्णय घेत नाहीत, त्यामुळे मोठे नुकसान टाळले जाते.