Heart Attack yandex
लाईफस्टाईल

Heart Attack Signs: हार्ट अटॅकची 'ही' लक्षणे झोपेतच जाणवतात, वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिल्ला सल्ला

Silent Heart Attack: हार्ट अटॅकचे सायलेंट लक्षणं अनेकजण ओळखत नाहीत. रात्री झोपेत छाती दुखणे, श्वास घ्यायला त्रास, थकवा, चक्कर किंवा थंड घाम येणे याकडे गांभीर्याने लक्ष द्या.

Sakshi Sunil Jadhav

हार्ट अटॅकचे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जगभरात अनेक लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. ताणतणाव, मानसिक अस्थिरता आणि वाढलेलं ब्लड प्रेशर या सर्व कारणांनी हार्ट अटॅकचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. त्यात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे काही लक्षणं अशी असतात जी लोक दुर्लक्ष करतात किंवा समजून घेत नाहीत. हीच सायलेंट लक्षणं रात्री उशिरा दिसू शकतात आणि अनेकदा जीवघेणी ठरू शकतात.

रात्री झोपेत असताना छातीत अस्वस्थता जाणवणं हे एक महत्त्वाचं संकेत असू शकतं. छातीमध्ये दाब, जडपणा किंवा दुखण्याची भावना जाणवली, तर ते हृदयाशी संबंधित समस्या असू शकते. बऱ्याचदा लोक हे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम किंवा थकवा म्हणून सोडून देतात, पण हे दुर्लक्ष जीवावर बेतू शकतं.

श्वास घेण्यात अचानक त्रास होणं हेही एक महत्त्वाचं लक्षण आहे. अनेक लोक कोणतीही शारीरिक मेहनत न घेता श्वास गुदमरल्यासारखा होतो, अशी तक्रार करतात. हे हृदय नीट काम न करण्याचं लक्षण असू शकतं.

अनेकदा मळमळ, चक्कर येणं किंवा थकवा जाणवणं ही लक्षणं हार्ट अटॅकची सुरुवातीची चिन्हं असतात. शरीरात कमजोरी जाणवणं, अन्न खाण्याची इच्छा न होणं किंवा अचानक थकवा येणं हे सगळं दुर्लक्ष केल्यास गंभीर ठरू शकतं.

रात्री झोपेत असतानाही अचानक थंड घाम येणं हेही हृदयाच्या अस्थिरतेचं द्योतक असू शकतं. जर कोणत्याही कारणाशिवाय वारंवार थंड घाम फुटत असेल, तर त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं.

हार्ट अटॅक केवळ छातीत दुखण्यानेच ओळखला जात नाही, तर या सायलेंट लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे अशा कोणत्याही असामान्य लक्षणांचा अनुभव आला, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

SCROLL FOR NEXT