Oral Cancer Symptoms Saam Tv
लाईफस्टाईल

Oral Cancer Symptoms: बॉडीमध्ये दिसतात ही लक्षणे तर असू शकतो तोंडाचा कर्करोग, वेळीच घ्या काळजी

Mouth Cancers in Information in Marathi: कर्करोग हा गंभीर आजार असून त्यावर वेळीच उपचार करणे देखील गरजेचे आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. ज्याच्याविषयी आपल्याला फारसे माहित नाही. तोंडाच्या कर्करोगाबद्दल अनेकांना माहित नाही. हा कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे.

कोमल दामुद्रे

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे:

कर्करोग हा गंभीर आजार असून त्यावर वेळीच उपचार करणे देखील गरजेचे आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. ज्याच्याविषयी आपल्याला फारसे माहित नाही. तोंडाच्या कर्करोगाबद्दल अनेकांना माहित नाही. हा कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे.

हा कर्करोग (Cancer) जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजूस होतो. जे लोक सतत गुटखा, सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन करणाऱ्या लोकांना याचा सामना करावा लागतो. तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे (Symptoms) कोणती? यावर उपचार कसा कराल? जाणून घेऊया सविस्तर

1. तोंडात रक्तस्त्राव

तोंडातून सतत रक्तस्त्राव होणे हे देखील तोंडाच्या कर्करोगाच्या लक्षणांपैकी एक आहे. याची लक्षणे सुरुवातीला हळूहळू दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्या

2. तोंडात सुन्नपणा येणे

तोंडात सतत बधीरपणा येत असेल किंवा मानेच्या कोणत्याही भागावर मुंग्या येत असतील तर याकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.

3. तोंडात फोड येणे

तोंडात फोड येणे किंवा कारणाशिवाय जखम झाली असेल आणि दोन आठवड्यांतही बरी होत नसेल तर हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यातून बाहेर पडणाऱ्या रक्ताकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4. दात दुखणे

तोंडाच्या कर्करोगाचे सुरुवातीला दात मोकळे होऊ लागतात. खाताना किंवा पिताना दातांमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. यामध्ये कधी कधी रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.

5. तोंडाचा कर्करोग टाळण्यासाठी उपाय

  • तंबाखूचे सेवन करणे टाळा.

  • मद्यपानपासून दूर राहा.

  • कडक सूर्यप्रकाशापासून दूर राहा.

  • आपल्या आहारात हिरव्या भाज्या, फळे, सलाद आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.

  • प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime : घरात सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; डमी ग्राहक पाठवत पोलिसांची छापेमारी, दांपत्याला अटक

Pune Accident: श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला, ३५ जणांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवताना पती विहिरीत पडल्या

Milk For Skincare : अशाप्रकारे करा त्वचेसाठी दुधाचा वापर, त्वचा होईल टवटवीत, चेहरा दिसेल तरूण

सैराट! प्रेमप्रकरणातून दोघे फरार, भावानं रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचं मुंडन करत संपवलं; दाजीचाही जीव घेतला

SCROLL FOR NEXT