Blood Clot in Brain Saam TV
लाईफस्टाईल

Blood clot : मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यानंतर शरीर देतं 'हे' संकेत, वेळीच लक्ष द्या

Blood clot in brain: जास्त प्रमाणात शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होणं आरोग्यासाठी योग्य नव्हे. जेव्हा मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार होते किंवा शरीराच्या कोणत्याही भागात तयार झालेली गुठळी मेंदूपर्यंत पोहोचते.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. यामध्ये मेंदूचं कार्यही फार महत्त्वाचं मानलं जातं. आपल्याला कधी खरचटलं किंवा लागलं की काही वेळाने दुखापत होते. यानंतर त्या ठिकाणी रक्ताची गुठळी तयार होते. रक्ताच्या गुठळ्या तयार होणं ही शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे. जी वाहणारं रक्त थांबवण्याचं काम करते.

मात्र जास्त प्रमाणात शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होणं आरोग्यासाठी योग्य नव्हे. जेव्हा मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार होते किंवा शरीराच्या कोणत्याही भागात तयार झालेली गुठळी मेंदूपर्यंत पोहोचते. त्यावेळी ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते. परंतु काही लक्षणं आहेत, ज्याच्या मदतीने या रक्ताच्या गुठळ्या आधीच लक्षात येऊ शकतात. जाणून घेऊया ही लक्षणं काय आहेत.

अचानक डोकेदुखी होणं (Sudden Headache)

डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. त्यामुळे आपण अनेकदा याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहितीये का की, जर तुम्हाला अचानक तीव्र वेदना जाणवत असतील तर ते अनेक समस्यांचं लक्षण असू शकतं. त्यापैकी एक म्हणजे मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार होणं.

शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा (One Side Weakness In In Body)

शरीराच्या एका भागात अशक्तपणा हे एक सामान्य लक्षण नाहीये. हे लक्षणं पक्षाघात, ब्रेन स्ट्रोक, ब्रेन कॅन्सर, ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणं यांसारख्या शरीरातील काही मोठ्या आजाराचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.

शरीराचा समतोल बिघडणं (Body Balance Problems)

जर तुम्हाला अचानक शरीराचा समतोल राखण्यात अडचण येऊ लागली, तर हे तुमच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार होत असल्याचंही हे लक्षण असू शकतं. अनेक प्रकरणांमध्ये, मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्यानंतर हे पहिलं लक्षण मानलं जातं.

सतत चक्कर येणं (Frequent Dizziness Episodes)

जेव्हा मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार होते आणि काही कारणास्तव आपण त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा सतत तुम्हाला चक्कर येऊ शकते. त्यामुळे जर एखाद्याला अचानक पुन्हा पुन्हा चक्कर येऊ लागली तर त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT