Liver Disease google
लाईफस्टाईल

Liver damage: लिव्हर खराब होण्यापूर्वी हातावर दिसतात संकेत; डॉक्टरांनी सांगितली ५ महत्त्वाची लक्षणं

Signs on hands before liver damage: यकृत हे मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाच्या आणि विषारी पदार्थ फिल्टर करणाऱ्या अवयवांपैकी एक आहे. ज्यावेळी यकृत योग्यरित्या काम करणं थांबवतं किंवा ते निकामी होऊ लागतं तेव्हा त्याची लक्षणं हातांमध्ये दिसून येतात.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे लिव्हर. लिव्हरच्या माध्यमातून दररोज शरीराची अनेक कामं केली जातात. यामध्ये पचनाला मदत करणं, रक्त शुद्ध कणं, हार्मोन्स नियंत्रित करणं यांसारखी अनेक कामं लिव्हरच्या माध्यमातून होत असतात. मात्र ज्यावेळी या अवयवाच्या कार्यात कोणताही अडथळा येतो त्यावेळी काही लक्षणं दिसून येतात.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आपण फक्त सामान्य लक्षणांकडे पाहतो. मात्र लिव्हरच्या समस्येची काही लक्षणं ही हातांमध्ये देखील दिसून येतात. परंतु त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. हातांमध्ये लालसरपणा, खाज, नखांमध्ये बदल, बोटे थरथरणं ही लक्षणं फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस किंवा सिरॉसिससारख्या आजारांचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.

हातांमधून दिसणारे लिव्हरच्या आजाराचे संकेत

हात हा शरीराच्या अंतर्गत आरोग्याचा आरसा मानला जातात. जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हिपॅटॉलॉजीच्या माहितीनुसार, हातांमध्ये दिसणारे बदल जसं की, पाल्मर एरिथेमा आणि नेल क्लबिंग हे दीर्घकालीन यकृत आजारांशी संबंधित असतात.

तळहात लाल होणं

जर तळहात, विशेषतः अंगठा आणि करंगळीखालील भाग लालसर दिसत असेल तर तो यकृताच्या कार्यातील बिघाडाचा एक संकेत असू शकतो. रक्तातील इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढल्यामुळे ही स्थिती निर्माण होऊ शकते. थकवा किंवा पिवळसरपणा यांसोबत ही लक्षणं दिसल्यास तात्काळ तपासणी करावी.

ड्युप्युट्रेन कॉन्ट्रॅक्चर

जर बोटं आतील बाजूला वळू लागली किंवा तळहाताखालील टिश्यू घट्ट होऊन हालचाल कठीण झाली, तर ही स्थिती लिव्हरच्या दीर्घकालीन आजारांशी संबंधित असू शकतं. सिरायसिस असलेल्या किंवा मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हे लक्षण दिसतं.

टेरी’स नेल्स

जर तुमची नखं पांढरी दिसत असतील आणि टोकाला गुलाबी किंवा लालसरपणा दिसत असेल तर ती टेरी’स नेल्सची लक्षणं आहेत. ही स्थिती यकृत सिरॉसिसमुळे रक्तप्रवाह आणि प्रोटीनच्या पातळीत बदल झाल्यामुळे दिसतं. हृदयविकार किंवा मधुमेहातही ही लक्षणं दिसू शकतात. मात्र लिव्हरच्या आजारात हे गंभीर संकेत मानले जातात.

नेल क्लबिंग

नखांचं टोक गोलसर आणि फुगलेलं दिसणं हे नेल क्लबिंगचं लक्षण आहे. हे फुफ्फुस आणि हृदयाच्या आजारांमध्ये दिसून येतं. मात्र सिरॉसिससारख्या यकृताच्या आजारांमध्येही हा बल दिसून येतो. रक्ताभिसरणातील बदलांमुळे नखांच्या आकारात बदल होतो.

तळहात व तळपायांमध्ये खाज

तळहात आणि तळपायांमध्ये सतत खाज येणं, पण पुरळ नसणं हे कोलेस्टेसिसचे लक्षण आहे. यात पित्ताच्या प्रवाहात अडथळा येतो आणि त्वचेखाली पित्तसाल्ट साचल्यामुळे तीव्र खाज निर्माण होते. ही स्थिती रात्री किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर अधिक तीव्र होते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : 'मी तुझ्या वडिलांची हत्या..' नवऱ्याची हत्या करून बॅगेत भरलं; बायकोनं थेट मुंबई गाठली अन्..

वर्गात ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने मुस्लिम शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण|VIDEO

हनीमूनला गेल्यावर रूमची लगेच लाईट लावता? 'ही' चूक पडेल महागात? तज्ज्ञ काय सांगतात?

Chakli Tips: घरी असलेल्या चकल्या मऊ झाल्यात? या सोप्या टिप्सने पुन्हा होतील कुरकुरीत आणि खुसखुशीत

Maharashtra Live News Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसने केली मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT