Side Effects Of Sitting Wrong positions Saam Tv
लाईफस्टाईल

Wrong Sitting Posture: ऑफिसमध्ये एकाच जागी बसून काम करण्याची सवय आहे? शरीराच्या या भागांवर होऊ शकतो परिणाम

Back Pain : आपल्यापैकी अनेक लोक लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर खुर्चीवर बराच वेळ बसून राहातात त्यामुळे आपल्या पाठीच्या कण्यावर परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Effects of Wrong sitting Posture in the Office :

कामाचा व्याप, बदलेली जीवनशैली व घरुन काम करण्याची सवय यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. ऑफिसमध्ये आपल्याला तासन तास बसण्याची सवय आपल्याला आरोग्याला घातक ठरु शकते.

आपल्यापैकी अनेक लोक लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर खुर्चीवर बराच वेळ बसून राहातात त्यामुळे आपल्या पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. अनेकदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आरोग्याचे अनेक विकार जडतात.

एका अहवलानुसार समोर आले आहे की, जे दिवसभर एकाच जागी बसून काम करतात त्यांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. साधारणपणे या समस्या एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यामध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात.

1.पाठदुखी

जर तुमची खुर्ची तुम्हाला पाठीमागे आधार देत नसेल आणि तुम्ही आधार न घेता बसून राहिल्यास पाठ दुखू (Back Pain) लागते आणि हे दुखणे मानेपासून सुरू होऊन मणक्याच्या हाडापर्यंत जाते.

2. लठ्ठपणा

जर तुम्ही एकाच स्थितीत बराच वेळ खुर्चीवर बसून कोणतीही हालचाल केली नाही तर तुमच्या शरीराचा (Body) खालचा भाग वाढू लागतो आणि येथे चरबी जमा होते.

3. एकाग्रतेचा अभाव

जेव्हा तुम्ही खुर्चीवर चुकीच्या स्थितीत बसून तासनतास काम करता, तेव्हा तुमची एकाग्रताही कमी होऊ लागते, कारण अस्वस्थपणे बसल्याने व्यक्तीचे लक्ष वारंवार त्याच जागेकडे जाते, त्यामुळे पाठ आणि हाताचा योग्य आधार घेऊन खुर्चीवर बसणे आवश्यक आहे.

4. खांदा दुखणे

जे लोक खुर्चीवर बसून लॅपटॉपवर (Laptop) काम करतात आणि कीबोर्डवर बोटे सतत हलवतात, त्यांच्या हातापासून खांद्यापर्यंत वेदना सुरू होतात.

5. शरीराला पुरेसे रक्त न मिळणे

तासनतास एकाच स्थितीत बसल्याने रक्ताभिसरणावरही परिणाम होतो. विशेषत: खुर्चीवर बसून काम केल्याने खांदे, पोट आणि कंबरेमध्ये रक्तप्रवाह नीट होत नाही, त्यामुळे शरीरात मुंग्या येणे किंवा बधीरपणा सारखी समस्या उद्भवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT