तुम्हीही तुमचा बहुतेक दिवस रील्समधून स्क्रोल करण्यात घालवता का? ही सवय तुम्हाला काही काळ नक्कीच आनंदी ठेवू शकते. पण तुम्हाला माहिती आहे का की रील पाहण्याची आणि दिवसभर मोबाईल वापरण्याची सवय तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. विशेषतः मुलांमध्ये रील्स पाहण्याची सवय वाढत चालली आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त रील्स पाहण्याची सवय आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते. यामुळे कोणत्याही कामावर जास्त वेळ लक्ष केंद्रित करण्याच्या तुमच्या क्षमतेवर, मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
रील्सची सवय किती हानिकारक आहे?
तज्ञांचे मते, रील्स पाहण्याची सवय आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवते. तुमच्या रीलवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या कंटेंटचा वेग एखाद्या कामावर जास्त काळ लक्ष केंद्रित करण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो. याशिवाय, अनेक अभ्यासांमध्ये, रील पाहण्याची सवय डोपामाइन सोडण्याच्या गतीला ट्रिगर करत असते असे दिसून आले आहे. ज्यामुळे तुम्हाला कमी आनंद मिळतो.
रील्सचे दुष्परिणाम
जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल जे अनेकदा रील्स पाहतात. तर लवकच तुम्हाला त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतील. परंतु त्याचा धोका कमी करण्यासाठी, ध्यान-योगासारखे सारख्या गोष्टींना तुमच्या रुटीनचा भाग बनवा. ज्यामुळे तुमचा मूड आणि झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. तसेच रीलच्या सवयीमुळे होणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्या कमी होऊ शकतात.
स्वतःसाठी १० मिनिटे काढा
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही कुठेही, काम करताना किंवा प्रवास करताना, ओपन अवेअरनेस मेडिटेशन करू शकता. म्हणजेच, रील्सच्या या वेगवान जगात, तुम्ही फक्त १० मिनिटे स्वतःसाठी काढून अनेक फायदे मिळवू शकता.
हे ध्यान कसे करावे
सर्वप्रथम डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना स्ट्रेस रिलीज करा. यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढेल आणि मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टम शांत राहील. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. जर तुमचे मन भरकटत असेल तर हळूवारपणे तुमचे लक्ष पुन्हा श्वासाकडे वळवा. १० मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करण्याच्या या व्यायामाच्या मदतीने तुम्ही ४०% ताण कमी करू शकता.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.