दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

New Assam Law Makes Bigamy a Crime: दुसरं लग्न करायचा विचार असेल... तर सावधान... ही बातमी तुमच्यासाठी आहे.. दुसरं लग्न कायद्याने आता गुन्हा ठरणार.. हा नियम नेमका कुठे करण्यात आलाय? बहुविवाहावर बंदी कोणी आणि का आणली?
Assam Chief Minister Himanta Biswa Sarma announcing the new anti-polygamy law that makes second marriage a criminal offence.
Assam Chief Minister Himanta Biswa Sarma announcing the new anti-polygamy law that makes second marriage a criminal offence.Saam Tv
Published On

विवाहीतांनो सावधान!... दुसरा लग्न करण्याची हिंमत कराल.. तर तुमचा पत्ता थेट जेलचा असेल...होय जेल पत्ता आणि 10 वर्षांची कठोर शिक्षा...आसाम सरकारनं पॉलिगॅमी विधेयकात केलेल्या कायद्यानुसार पहिला विवाहसंबंध अस्तित्वात असताना दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार आहे... ज्यामुळे दुसरं लग्न करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागू शकतो..

दुसरं लग्न कराल, 10 वर्षं जेल- HDR

पहिला विवाहसंबंध अस्तित्वात असताना दुसरं लग्न गुन्हा ठरणार

7 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो

पहिल्या विवाहाची माहिती लपवून दुसरं लग्न केल्यास 10 वर्षांची जेल

चुकीची माहिती देऊन विवाह लपवणाऱ्यावरही कारवाईची तरतूद

सरकारी नोकरी आणि योजनांचा लाभ मिळणार नाही

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवता येणार नाही

दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी बेकायदेशीर बहुविवाह पद्धतीच्या बळी पडलेल्या महिलांसाठी हा नवीन कायदा फायदेशीर ठरणार असल्याचंही आसामचे सरमा म्हणालेत...

दुसरीकडे बहुविवाह पद्धतीवर बंदी आणण्याबरोबरच लव्ह जिहादसारख्या घटना थांबवण्यासाठी फेब्रवारीला एक विधेयक आसाममध्ये मांडलं जाणार आहे.. मात्र बहुविवाह रोखण्यासाठीचा आसामचा हा निर्णय आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या महिलांना सरंक्षण देणारा आहे...मुळात अनेक प्रकरणांमध्ये महिलांना नवऱ्याच्या दुसऱ्या विवाहाचा मनस्ताप सहन करावा लागतो...मात्र आसाम सरकारचं हे विधेयक महिलांचे हक्क आणखी मजबूत करून कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक निर्णायक पाऊल आहे... हे निश्चित..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com