Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

कोब्बरी मिठाई

दक्षिण भारतीय घराघरात लोकप्रिय असलेली कोब्बरी मिठाई म्हणजे नारळ, गूळ आणि वेलचीच्या सुगंधाची अफलातून जुगलबंदी. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात ही मिठाई सणावाराला खास बनवली जाते. कमी साहित्य, कमी वेळ आणि जिभेला पाणी सुटेल अशी स्वादिष्ट ही डिश आता तुम्हीही घरच्या घरी सहज बनवू शकता.

Kobbari mithai recipe

ताजं किसलेलं नारळाचं खोबरं

कोब्बरी मिठाईसाठी ताजा किस (Fresh Grated Coconut) वापरल्यास चव उत्तम येते. सुका नारळ वापरू नये.

Kobbari mithai recipe

गुळाचा पाक तयार करणे

एका पॅनमध्ये गूळ व थोडे पाणी घालून हलका पाक बनवा. पाक एकसारखा आणि ओतण्याजोगा असावा.

coconut jaggery sweet

गूळ चाळून घ्या

गुळात माती किंवा तुकडे राहू नयेत म्हणून पाक चाळून स्वच्छ मिश्रण घ्या.

coconut jaggery sweet

नारळ आणि गूळ एकत्र शिजवा

आता चाळलेला गूळ पाक आणि नारळ एकत्र करून मध्यम आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहा. मिश्रण शिजताना त्यात पाव चमचा टीस्पून वेलची पावडर घाला. यामुळे मिठाईला छान सुगंध आणि पारंपरिक चव येते.

coconut jaggery sweet

मिश्रण पॅनमध्ये चिकटू नये म्हणून सतत हालवा

कोब्बरी मिश्रण पटकन घट्ट होते. त्यामुळे तळाला चिकटू नये म्हणून सतत हलवत राहणे आवश्यक आहे.

coconut jaggery sweet

तुपाने लावलेल्या प्लेटमध्ये ओतणे

मिश्रण घट्ट आणि एकजीव झाले की ते गॅसवरून उतरवून तुपाने चोपडलेल्या प्लेटमध्ये ओतून समतल करा.

coconut jaggery sweet

आवडीनुसार आकार कापा

थोडे थंड झाल्यावर मोकळ्या हाताने चौकोनी किंवा डायमंड आकारात कापा. पूर्ण थंड होईपर्यंत तसंच सेट होऊ द्या. कोब्बरी मिठाई एअर-टाइट डब्यात 7-10 दिवस चांगली टिकते. चहा किंवा सणाच्या दिवशी गोड म्हणून सर्व्ह करा.

coconut jaggery sweet

NEXT: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकदा टेस्ट करून पाहाच

kokum soup
येथे क्लिक करा