Shravan Special SAAM TV
लाईफस्टाईल

Shravan Special : उपवासाला खिचडीला करा बाय बाय; बनवा हेल्दी राजगिरा लाडू, एकदा खाल तर खातच रहाल

Rajgira Ladoo Recipe : श्रावणात उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, सोमवारी उपवासाला गोड, चविष्ट राजगिरा लाडू बनवा. काही मिनिटांत पोट भरेल. सोपी रेसिपी जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या श्रावण महिन्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक व्रत करून उपवास करतात. अशात उपवासाला आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. उपवासात तेलकट पदार्थ खाणे टाळावे. कारण ॲसिडीटीची समस्या उद्भवते. अशा वेळी गोड पदार्थ खाणे उत्तम राहते. चला तर मग उपवासाला झटपट बनवता येईल अशा राजगिरा लाडूची रेसिपी जाणून घेऊयात.

साहित्य

कृती

श्रावणात उपवासाला राजगिरा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये गूळ घालून मध्यम आचेवर ढवळत रहा. त्यात थोडे पाणी घाला. म्हणजे गूळ पॅनला चिकटणार नाही. गूळ वितळायला लागल्यावर त्यात राजगिरा, भाजलेले शेंगदाणे आणि बारीक काप केलेला सुकामेवा टाका. हे सर्व मिश्रण छान ढवळून एकत्र करून घ्या. लक्षात असू द्या की गॅस मंद आचेवर असावा. या मिश्रणाला पाणी सुटू लागेपर्यंत छान शिजवा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे गोल लाडू वळून घ्या. हाताला तेल लावायला विसरू नका. सर्व लाडू करून झाल्यावर एका ताटात ते कोरडे होईला ठेवून द्या. १ तासांनी राजगिऱ्याच्या लाडूचा आस्वाद घ्या. अधिक काळ हे लाडू टिकवण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवा.

बहुगुणी राजगिरा

  • राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम, फायबर, कार्बोहाइड्रेट, प्रथिने इत्यादी पोषक घटकांचा समावेश असतो.

  • नियमित आहारात राजगिऱ्याचे पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते.

  • अपचनाचा त्रास उद्भवत नाही.

  • राजगिऱ्यामुळे पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते.

  • राजगिरा ग्लूटेन फ्री पदार्थ असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

  • राजगिरा खाल्ल्याने त्वरित शरीराला ऊर्जा मिळते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT