Can diabetics eat bananas daily SAAM TV
लाईफस्टाईल

Bananas for diabetic patients: डायबेटिस पेशंटनं रोज केळी खावीत आणि किती खावीत? ब्लड शुगर वाढते? सगळ्या प्रश्नांचं १ उत्तर अन् दूर होतील सगळे गैरसमज

Can diabetics eat bananas daily: मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी आहार निवडताना प्रत्येक फळाचे महत्त्व वेगळे असते. केळी हे भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ आहे. पण मधुमेही रुग्णांनी दररोज केळी खावे का, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

सकाळच्या नाश्तामध्ये फळं असावीत असं अनेक डॉक्टरांचं म्हणणं असतं. अशावेळी एक हेल्दी नाश्ता म्हणून अनेकजण केळी खातात. स्वस्त, मस्त आणि आरोग्यादायी केळी हे एक परिपू्र्ण स्नॅक मानलं जातं. परंतु बऱ्याचदा लोकांच्या मनात प्रश्न येतो की, वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी आणि ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींचं केळी खावीत का?

मधुमेही रूग्णांनी केळी खावीत का?

प्रत्येक फळामध्ये साखरेचं प्रमाण असतं, त्याचप्रमाणे केळ्यांमध्ये साखर असते. मात्र आपण दररोज घेणाऱ्या साखरेच्या मानाने केळ्यांमधील साखर एक चांगला पर्याय मानला असतो. ज्या व्यक्तींना मधुमेह असून शुगर कंट्रोमध्ये ठेवायची आहे किंवा वजन कमी करायचं असेल त्यांनी कच्ची केळी खाल्ली पाहिजेत.

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, जीवनसत्त्वं, खनिजं असतात. यामुळे साखरेचं शोषण किती वेगाने होईल यावर परिणाम होतो. त्यामुळे फळं आणि भाज्या प्रत्येकाच्या आरोग्यावर सारखाच परिणाम करतात असं नाही.

दिल्लीतील एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉ. अर्जुन मल्होत्रा यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला एक संतुलित आहार घ्यायचा असेल तर दिवसाला तुम्ही एका केळ्याचं सेवन करू शकता. मात्र केळी खाल्ल्यानंतर त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून तुम्ही ते खावं की नाही याबाबत निर्णय घेऊ शकता.

केळ्याचा ब्लड शुगरवर कसा परिणाम होतो?

केळीमध्ये सहज पचणारे कार्ब्स असतात. हे कार्ब्स पचनसंस्थेमध्ये जाऊन पटकन ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे रक्तातील साखर वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना डायबेटीस नाही त्यांच्या शरीरात इन्सुलिन सहजपणे ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचवतं. परंतु त्याची वाढ किती होईल हे केळं किती मोठे आणि किती पिकलेलं आहे यावर अवलंबून आहे.

पिकलेल्या केळ्याचा कसा होतो परिणाम?

केळं जसजसं पिकतं तसतसा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो. कारण कच्च्या किंवा अर्धवट पिकलेल्या केळ्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च जास्त प्रमाणात असतो. हा स्टार्च हळूहळू पचतो आणि रक्तातील साखर अचानक वाढत नाही. पूर्णपणे पिकलेल्या केळ्यामध्ये मात्र साधी अधिक प्रमाणात साखर असते. त्यामुळे ग्लुकोज पटकन रक्तात प्रवेश करू शकतो.

फायबर साखरेचं शोषण कमी करतात

जर तुम्हाला शरीरात फायबरची गरज असेल तर केळी हा एक चांगला स्त्रोत मानला जातो. या फायबरमुळे पचन आणि साखरेचं शोषण मंदावलं जातं. त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही आणि पोट भरल्यासारखं वाटू लागतं. फायबरचं सेवन केल्याने आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास आणि इन्सुलिनटी संवेदनशीलता वाढवण्यास मदत होते.

दररोज केळी आणि इन्सुलिन

ज्यांना चयापचयाशी संबंधित समस्या नाहीत, त्यांच्यासाठी दररोज एक केळे खाल्ल्याने धोकादायक रक्तातील साखरेतील चढउतार होत नाहीत. मात्र, प्रमाणावर नियंत्रण ठेवणे आणि केळे प्रथिने किंवा आरोग्यदायी चरबीसोबत खाणे हे इन्सुलिन प्रतिकार असलेल्या किंवा मधुमेह असलेल्या लोकांसाठी विशेषतः उपयुक्त ठरते.

रक्तातील साखर कधी वाढते?

दररोज दोनपेक्षा जास्त केळी खाल्ल्याने तसंच रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यने किंवा इतर उच्च ग्लायसेमिक पदार्थांसोबत केळी खाल्ल्यास काही लोकांमध्ये ब्लड शुगर पटकन वाढू शकते. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ही शक्यता अधिक असते. त्यामुळे मधुमेही रूग्ण केळी खाऊ शकतात. मात्र केळं खाण्यापूर्वी लहान आणि अर्धवट पिकलेलं केळं निवडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचे 'कॅन्डिडेट बॉम्ब'; १५ कोटींची ऑफर नाकारणारे उमेदवार स्टेजवरच आणले

Maharashtra Live News Update : विमानतळावर गरबा खेळला, पण गणपतीत ढोल-लेझीम वाजले नाहीत- राज ठाकरे

स्वकीयांकडून महाराष्ट्राचा घात; राज ठाकरेंचा अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून CM फडणवीसांना टोला

माजी उपराष्ट्रपतींची तब्येत बिघडली; दोन वेळा बेशुद्ध झाल्यानंतर थेट AIIMS मध्ये दाखल

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किन हवी असेल तर रोज रात्री चेहऱ्यावर लावा 'हे' जेल आठवड्याभरात मिळेल फरक

SCROLL FOR NEXT