Risks of oversleeping: फायदा नाही तर तोटाच! जास्त झोपेमुळे 'या' आजारांचा धोका वाढतो, संशोधनातून बाब उघड

Side effects of sleeping too much: आपल्याला नेहमी असे शिकवले जाते की, शरीराला पुरेसा आराम देण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. पण, तुम्हाला हे माहीत आहे का की, प्रमाणापेक्षा जास्त झोप (Oversleeping) घेणे आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकते?
Sleep related habits
Sleep related habitssaam tv
Published On
Summary
  • ७ तासांपेक्षा कमी झोप धोकादायक आहे.

  • ९ तासांपेक्षा जास्त झोप मृत्यूचा धोका वाढवते.

  • जास्त झोप हृदयविकाराचा धोका वाढवते.

आपल्या प्रत्येकासाठी झोप ही महत्त्वाची असतेच. झोप ही आपल्या शरीरासाठी औषधासारखी आहे. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, जास्त झोप देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. संशोधकांनी ७९ जुन्या रिसर्चचा आढावा घेतला, ज्यामध्ये किमान एक वर्ष लोकांच्या झोपेच्या सवयींवर आणि त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आल्याचं दिसून आलं.

झोप आणि मृत्यूचा धोका यांच्यातील संबंध

या अभ्यासात असं पाहायला मिळालं की, ज्या व्यक्ती दररोज ७ तासांपेक्षा कमी झोप घेत होत्या त्यांचा मृत्यूचा धोका १४ टक्क्यांनी वाढला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे जे लोक ९ तासांपेक्षा जास्त झोप घेतात, त्यांचा मृत्यूचा धोका तब्बल ३४ टक्क्यांनी जास्त असतो. याचसारखा निष्कर्ष २०१८ मध्ये झालेल्या एका मोठ्या संशोधनातही नोंदवला गेला असल्याचं समोर आलं होतं.

जास्त झोप आणि आरोग्य यामध्ये थेट संबंध नाही. मात्र त्याचा संबंध (correlation) अनेक आजारांशी दिसून आला आहे. ज्यामध्ये नैराश्य, लठ्ठपणा, दीर्घकालीन वेदना, मेटाबॉलिक समस्या अशा आरोग्याच्या अडचणींचा समावेश होतो.

Sleep related habits
Sleep hours by age: तुमच्या वयोमानानुसार तुम्ही किती तास झोप घेतली पाहिजे?

जास्त झोपेमुळे होणारे धोके

हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो

जास्त झोप घेणाऱ्या लोकांना हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांचा धोका अधिक असतो. ९ तासांपेक्षा जास्त झोपेमुळे रक्तदाब आणि हृदयाची गती यामध्ये अनियमितता निर्माण होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो.

डिप्रेशन वाढण्याचा धोका

जास्त झोप ही नैराश्याचं लक्षणही असू शकते आणि ती नैराश्य वाढवणारी देखील ठरते. खूप झोपणारे लोक बहुतेक वेळा थकवा, कामात रस न लागणं आणि निराशा अनुभवतात. झोपेची ही अनियमितता शरीरातील हार्मोन्स आणि बायोलॉजीकल क्लॉक बिघडवतं ज्यामुळे डिप्रेशन आणखी गंभीर होतं.

Sleep related habits
Symptoms of bad cholesterol: वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात होऊ लागतात 'हे' बदल; पाहा कोलेस्ट्रॉल तपासण्याची योग्य वेळ कोणती?

वजन वाढ आणि लठ्ठपणा

जास्त झोपेमुळे शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे शारीरिक हालचालींचा अभाव आणि चुकीच्या आहाराच्या सवयी तयार होतात. त्याचबरोबर झोपेच्या कालावधीतील अनियमिततेमुळे मेटाबॉलिझम आणि भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स अनियंत्रित होतात. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.

Sleep related habits
Drinking Water According to Age: वयोमानानुसार तुम्ही किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

सततच्या वेदना

झोप शरीराला विश्रांती देते मात्र खूप वेळ झोपल्याने पाठदुखी, संधिवात किंवा स्नायूंच्या वेदना वाढू शकतात. लांब वेळ आडवे राहिल्याने सांधे कडक होतात. यामुळे स्नायूंवर ताण येतो. तसंच जास्त झोपेमुळे शरीरात ‘सी-रिऍक्टिव्ह प्रोटीन’ (CRP) वाढतं.

Sleep related habits
रात्री किती वाजता जेवावे? ही वेळ योग्य| What Is The Right Time To Eat At Night

डिमेंशियाचा धोका

नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार जास्त झोपेमुळे वृद्धांमध्ये डिंमेशिया आणि अल्झायमरचा धोका वाढू शकतो. दीर्घकाळ झोपेमुळे मेंदूच्या रचनेत बदल होतात आणि न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, याबाबत अजून संशोधनाची गरज आहे.

Sleep related habits
Sleep needs by age: वयाप्रमाणे झोपेची आवश्यकता बदलते; तुमच्या वयानुसार झोपण्याची योग्य वेळ कोणती?
Q

९ तासांपेक्षा जास्त झोपणाऱ्यांचा मृत्यूचा धोका किती टक्क्यांनी वाढतो?

A

९ तासांपेक्षा जास्त झोपणाऱ्यांचा मृत्यूचा धोका ३४ टक्क्यांनी वाढतो.

Q

जास्त झोप हृदयावर कसा परिणाम करते?

A

जास्त झोपमुळे रक्तदाब आणि हृदयगती अनियमित होऊ शकते.

Q

अतिझोप कोणत्या मानसिक आजाराशी संबंधित आहे?

A

अतिझोप नैराश्य (डिप्रेशन) आणि निराशेशी संबंधित आहे.

Q

जास्त झोपेमुळे वजन वाढण्याचे मुख्य कारण काय आहे?

A

मेटाबॉलिझम आणि भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स असंतुलित होतात.

Q

वृद्धांमध्ये जास्त झोप कोणत्या न्यूरोलॉजिकल समस्येचा धोका वाढवते?

A

जास्त झोप डिमेंशिया आणि अल्झायमरचा धोका वाढवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com