Mouthwash Health Impact :दररोज माऊथवॉश वापरणं खरंच योग्य आहे का? नव्या अभ्यासातून आरोग्यावर परिणाम होत असल्याचा खुलासा

Mouthwash Daily Use Health Impact Study: तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी अनेकजण दररोज माउथवॉश वापरतात. परंतु नवीन संशोधनानुसार दररोज माउथवॉश वापरण्याचे काही फायदे असले तरी त्याचे काही तोटेही आहेत.
Mouthwash Daily Use Health Impact Study
Mouthwash Daily Use Health Impact Studysaam tv
Published On

आपल्यापैकी अनेकजण माऊथवॉशचा वापर करत असतील. तोंडाला दुर्गंधी येऊ नये म्हणून याचा वापर केला जातो. हिरड्या स्वच्छ ठेवणं, प्लाक कमी करणं त्याचप्रमाणे तोंडाला दुर्गंधी येऊ नये हा याचा मुख्य उद्देश असतो. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनामध्ये माऊथवॉशचा वापर तुमच्या आरोग्यावर परिणाम करतो. एका अभ्यासात माउथवॉशचा नियमित वापर किती फायदेशीर किंवा हानिकारक ठरू शकतो याचा शोध घेण्यात आला.

माउथवॉश आणि डायबेटिसचा धोका

San Juan Overweight Adults Longitudinal Study मध्ये ४० ते ६५ वयोगटातील ९४५ अधिक वजनाच्या किंवा लठ्ठ असलेल्या प्रौढ व्यक्तींचा तीन वर्षे अभ्यास करण्यात आला. सुरुवातीला यापैकी कोणालाही डायबेटिस किंवा मोठा हृदयविकारची समस्या नव्हती. संशोधकांनी या अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांना ते किती वेळा माउथवॉश याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे त्यांच्यापैकी कोणाला प्री-डायबेटिस किंवा टाईप-२ डायबेटीस झालाय का हे पाहण्यात आलं.

अभ्यासातून काय समोर आलं?

या अभ्यासातून असं समोर आलं की, ज्या व्यक्ती दिवसातून किमान दोन वेळा माउथवॉशचा वापर करत होते त्यांना प्री-डायबेटिस किंवा डायबेटिस होण्याचा धोका जास्त होता. हा धोका तब्बल ४९ ते ५५ टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं. यामध्ये दिवसातून एकदाच किंवा त्यापेक्षा कमी वेळा माउथवॉश वापरणाऱ्यांमध्ये असा धोका आढळला नाही.

Mouthwash Daily Use Health Impact Study
Summer Health : उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे देखील आरोग्यासाठी घातक, वाचा दुष्परिणाम

माउथवॉश का वापरला जातो?

माउथवॉशचं खरं उद्दिष्ट म्हणजे तोंडातील जीवाणू नष्ट करणं, दुर्गंधी कमी करणं आणि हिरड्यांचे आजार टाळणं आहेत. अनेक माउथवॉशमध्ये क्लोरहेक्सिडीन, सेटिलपायरिडिनियम क्लोराइड, अल्कोहोल, आवश्यक तेलं, फ्लोराईड किंवा पेरॉक्साईड असतात. हे घटक प्लाक आणि जिन्जिव्हायटिसची समस्या कमी करण्यात मदत करतात.

अँटीबॅक्टेरियल माउथवॉशचा मेटाबॉलिझमवर परिणाम

बहुतेक माउथवॉशमध्ये विविध प्रकारचे जीवाणू नष्ट करणारे compounds असतात. याच्या वापराने धोकादायक बॅक्टेरिया नाही तर चांगले आणि गरजेचे बॅक्टेरियाही नष्ट होतात. अभ्यासामधून असं समोर आलंय की, अँटीबॅक्टेरियल माउथवॉश वापरल्याने लाळ आणि रक्तातील नायट्राईटचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे शरीरातील नायट्रिक ऑक्साईड कमी होतं.

Mouthwash Daily Use Health Impact Study
Sugar Risk Heart Attacks: साखरेमुळे केवळ डायबेटीजच नाही तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो? संशोधनातून धक्कादायक बाब उघड

काय काळजी घ्याल?

माउथवॉश फक्त गरज असेल तेव्हाच वापरावा. याचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

अल्कोहोल-फ्री माउथवॉश रोजच्या वापरासाठी अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

उच्च रक्तदाब किंवा ब्लड शुगर असलेल्या लोकांनी अँटीबॅक्टेरियल माउथवॉश नियमित वापरत करताना अधिक काळजी घ्यावी.

Mouthwash Daily Use Health Impact Study
Risks of oversleeping: फायदा नाही तर तोटाच! जास्त झोपेमुळे 'या' आजारांचा धोका वाढतो, संशोधनातून बाब उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com