Late Sleeping Risks: तरुणांनी सावध राहा! कमी वयात मृत्यूची शक्यता वाढवते उशिराची झोप, वैज्ञानिकांचा गंभीर इशारा

Sleep Health: उशिरा झोपण्याची सवय शरीराची नैसर्गिक लय बिघडवते, हार्मोन्स विस्कळीत करते आणि हृदयविकार, मानसिक तणाव तसेच अकाली मृत्यूचा धोका वाढवते, असे मोठ्या संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
sleep disorder study
Late Sleeping Risksgoogle
Published On

सध्या थंडीचे दिवस सुरु असल्याने अनेकांना सकाळी उठायचा त्रास होतो. काहींना ८ तासांपेक्षा जास्त झोप लागते. मात्र संशोधनात असे आढळले आहे की, जे लोक नियमितपणे खूप उशिरा झोपतात त्यांना अनेक आजारांना सतत सामोरे जावे लागते. त्यांच्या सकॅडियन लयमध्ये बिघाड होतो. कारण शरीराचे २४ तासाचे नैसर्गिक चक्र सुरु असते. त्यामध्ये हार्मोन्स, दुरुस्ती चक्र, मेटाबॉलिजम आणि मेंदूचे कार्य सुधारण्याचे काम करतं.

जेव्हा या चक्रात बिघाड निर्माण होतो तेव्हा कॉर्टिसोलसारखे संप्रेरके वाढतात आणि शरीरात जळजळ वाढते आणि हार्ट जास्त वेळ काम करतं. या काळामध्ये ह्दयरोग, कमकुवत प्रतिकारकशक्ती आणि चयापचय विकारांमुळे लवकर मृत्यूचा धोका वाढतो. तुमचे झोपेचे वेळापत्रक ही फक्त एक सवय नाही. ती एक जगण्याची प्रणाली आहे. त्यामुळे झोपेला आवश्यक वेळ देणे गरजेचे आहे.

sleep disorder study
Non Acidity Pohe Recipe: पित्त न वाढवणारे कांदे पोहे कसे बनवायचे? वाचा सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

रात्री उशिरापर्यंत जागत राहणे किंवा नाईट आउटची सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे, असा जर तुमचा समज असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. तब्बल 70,000 हून अधिक लोकांवर आठ वर्षे केलेल्या मोठ्या संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. सायकियाट्री रिसर्च या नामांकित जर्नलमध्ये याबाबतचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले असून, अभ्यासकांनी रात्री 1 वाजण्यापूर्वी झोपणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले आहे. 1 नंतर झोपण्याची सवय ठेवणारे लोक हळूहळू गंभीर समस्यांना आमंत्रण देत असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.

संशोधनात नैराश्य, चिंता या समस्याही उशिरा झोपणाऱ्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसल्या. तज्ज्ञांच्या मते, झोपेच्या वेळेचा मानसिक आरोग्यावर परिणाम होण्यामागील मोठे कारण म्हणजे रात्री उशिराच्या वेळेत घेतले जाणारे चुकीचे निर्णय. पहाटेच्या सुमारास आत्महत्येचे विचार, हिंसक कृती, धूम्रपान, मद्यपान, ड्रग्सचे सेवन, अतिखाणे यांसारख्या हानिकारक गोष्टींचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच, कोणताही प्रसंगी लवकर झोपणे मानसिक आरोग्यासाठी अनिवार्य करणं गरजेचं आहे.

sleep disorder study
VitaminB12 Facts: हाय-पाय सुन्न, मुंग्या येतात? शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता, वेळीच ओळखा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com