VitaminB12 Facts: हाय-पाय सुन्न, मुंग्या येतात? शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता, वेळीच ओळखा

Nerve Health: व्हिटॅमिन B12 ची कमतरता हात-पाय सुन्न होणे, मुंग्या येणे अशा सुरुवातीच्या लक्षणांतून दिसते. वेळेत उपचार न घेतल्यास नसांवरील परिणाम गंभीर होऊ शकतात. योग्य आहार आणि तपासणी अत्यावश्यक.
Nerve Health
VitaminB12 Factsgoogle
Published On
Summary
  • हात-पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे हे व्हिटॅमिन B12 कमतरतेचे पहिले आणि महत्त्वाचे लक्षण मानले जाते.

  • B12 कमी झाल्यास नसांचे संरक्षण आवरण कमजोर होते आणि त्यामुळे मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

  • वेळीच उपचार व B12 युक्त आहार घेतल्यास नसांवरील नुकसान थांबवता येतं.

व्हिटामिन B12 हे शरीरासाठी आवश्यक मानले जाणारे पोषक तत्व आहे. मात्र ते कधी घ्यावे, कसे घ्यावे आणि किती घ्यावे याबाबत अनेकांना योग्य माहिती नसते. त्यामुळे त्याची कमतरता वाढेपर्यंत लोकांना त्याची जाणीवही होत नाही. हातापायांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्नपणा जाणवणे ही B12 कमतरतेची अगदी सुरुवातीची लक्षणे मानली जातात. दिसायला किरकोळ वाटणारे हे लक्षण प्रत्यक्षात शरीरात घडत असलेल्या गंभीर बदलांची पूर्वसूचना असू शकते.

व्हिटामिन B12 शरीरात अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. हे जीवनसत्व नसांमधील पेशींचे आरोग्य टिकवते, लाल रक्तपेशींच्या निर्मितीत सहाय्य करते, DNA बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते तसेच मेंदू आणि मानसिक कार्यक्षमतेवर थेट प्रभाव टाकते. B12 चा थेट संबंध मज्जासंस्थेशी असल्याने त्याची कमतरता झाल्यावर शरीरातील न्यूरॉलॉजिकल संकेत कमकुवत होतात. त्यामुळे हात, पायात मुंग्या येणे, सुन्न वाटणे किंवा अशक्तपणा जाणवू लागतो.

Nerve Health
Dr Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिवस का म्हणतात? वाचा सविस्तर...

आपल्या नसांभोवती 'मायेलिन शीथ' नावाचे संरक्षण आवरण असते. त्यामुळे विद्युत संकेत जलद आणि व्यवस्थितपणे शरीरभर पोहोचू शकतात. B12 हे या संरक्षण आवरणाला टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा B12 ची पातळी कमी होते, तेव्हा हे आवरण तुटूतं, मज्जासंकेत मंदावतात आणि गोंधळलेले वाटतो. हात आणि पाय हे अवयव मज्जासंस्थेपासून सर्वात दूर असल्यामुळे सुरुवातीला त्यांनाच परिणाम होतो. म्हणूनच pins and needles सारखी चटका देणारी संवेदना ही B12 कमतरतेची पहिली न्यूरॉलॉजिकल लक्षणे मानली जातात. वेळेत उपचार न केल्यास हे मज्जासंवेदनांचे नुकसान कायमचे होऊ शकते.

याशिवाय स्नायूंमध्ये अशक्तपणा, लक्ष कमी होणे, संतुलन बिघडणे, स्मरणशक्ती कमी होणे, मूडमध्ये बदल किंवा नैराश्याची लक्षणेही दिसू शकतात. अशा लक्षणांची वेळेत ओळख अत्यंत महत्त्वाची आहे, कारण दीर्घकाळ राहिलेला मज्जातंतूंचा त्रास परत सुधारत नाही. काही लोकांमध्ये B12 कमतरतेची शक्यता जास्त असते. वय वाढत असताना पोटातील आम्ल कमी होत जाते. त्यामुळे B12 चे शोषण कमी होते. अशा लक्षणांचा अनुभव होत असल्यास आहारात B12 युक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. धान्ये, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, न्यूट्रिशनल यीस्ट हे पदार्थ उपयुक्त ठरू शकतात.

टीप: काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने B12 सप्लिमेंट्स किंवा इंजेक्शनही घ्यावे लागू शकतात. लक्षणे सुधारत नसल्यास किंवा वाढत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

Nerve Health
Methi Pulao Recipe: टिफिनसाठी पालेभाज्या-चपातीचा कंटाळा आला? ट्राय करा मेथीचा झणझणीत पुलाव, एकदा रेसिपी वाचाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com