Shardiya Navratri 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2024 : नवरात्री कधीपासून सुरू होतेय? नोट करा अष्टमी आणि नवमीच्या परफेक्ट तारखा

Shardiya Navratri 2024 Date and Time : नवरात्र केव्हा सुरू होणार? मुहूर्त काय? तसेच नवमी आणि अष्टमी केव्हा आहे याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

हिंदू धर्मात नवरात्री उत्सवाला फार जास्त महत्व आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीनुसार नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीचे नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा आणि अराधना केली जाते. या दिवसांत देवी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

नवरात्री कधी सुरू होणार आणि कधी संपणार?

यंदा पंचांगानुसार, शारदीय नवरात्र उत्सवाला ३ ऑक्टोबर दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपासून सुरुवात होत आहे. तसेच नवरात्र उत्सव १२ ऑक्टोबर २०२४ रोजी संपणार आहे.

घटस्थापना

नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला आवाहन केलं जातं. या दिवशी मंत्र पठण करत देवीची पुजा केली जाते. यालाच घटस्थापना असं सुद्धा म्हणतात. घटस्थापनेचा मुहूर्त ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून सुरू होत आहे. तर ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त संपत आहे. तसेच अभिजात मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असणार आहे.

कोणत्या दिवशी कोणती पूजा

पूजा कोणत्या दिवशी होणार?

३ ऑक्टोबर – माता शैलपुत्रीची पूजा

४ ऑक्टोबर – ब्रह्मचारिणी मातेची पूजा.

५ ऑक्टोबर – चंद्रघंटा मातेची पूजा

६ ऑक्टोबर – कुष्मांडा मातेचे पूजन

७ ऑक्टोबर – आई स्कंदमातेची पूजा

८ ऑक्टोबर – कात्यायनी मातेची पूजा

९ ऑक्टोबर – माँ कालरात्रीची पूजा

१० ऑक्टोबर – माँ सिद्धिदात्रीची उपासना

११ ऑक्टोबर – माँ महागौरीची पूजा

१२ ऑक्टोबर – दसरा

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात होते. हा उत्सव नवमीपर्यंत कायम राहतो. काही व्यक्तींच्या घरी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते. घटस्थापना करताना विशेष आणि कोणताही एक ठरावीक मुहूर्त पाळलाच पाहिजे असे काही नाही. तुम्ही पहिल्या दिवसभरात केव्हाही देवीची प्रतिष्ठापणा सुद्धा करू शकतात. या उत्सवाला सुरूवातीलाच पहिल्या दिवशी धान्य लावले जाते. ज्या टोपलीत धान्य लावले आहे ते शेवटच्या दिवशी जितके बहरते तितके आपले घर धन आणि संपत्तीने समृद्ध होते असे मानले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा येणार

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT