Navratri Utsav 2023: एकाच ठिकाणी साडेतीन शक्तिपीठांचं दर्शन; महाराष्ट्रातील 'या' मंदिराची आख्यायिका माहितीये का?

Sadetin Shakti Peeth: साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करताहेत.
Navratri Utsav 2023
Navratri Utsav 2023Saam TV
Published On

सचिन बनसोडे

Ahmednagar News:

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या साडेतीन शक्तीपिठांचे एकत्रीत दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी घेणं शक्य झालं आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एकमेव ठिकाण असलेल्या अहमदनगरच्या कोल्हार भगवती गावात हे पुरातन मंदिर आहे. (Latest Marathi News)

Navratri Utsav 2023
Sai Baba Darshan : साईंच्या नगरीत राजकारण करू नका : विखे पाटलांचा थोरातांना सल्ला

नवरात्र उत्सवात भक्तीचा जागर सुरू झाला असून राज्यातील साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करताहेत. मात्र तुम्हाला तुळजापूरची भवानीमाता, माहूरची रेणूका माता, कोल्हापूरची भगवती आणि वणीच्या सप्तश्रृंगी मातेचे दर्शन एकाच ठिकाणी करता येणं शक्य आहे.

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी आणि शिंगणापूरच्या मध्यावर कोल्हार गावात हे आगळ वेगळ मंदिर आहे. येथे तुम्हाला साडेतीन शक्तीपिठांचे एकत्रीत दर्शन घेता येईल. नवरात्रीचा मोठा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतोय. शेकडो वर्षांपूर्वी भक्ताच्या इच्छेखातर देवींनी एकत्रित दर्शन दिल्याची या मंदिराची आख्यायीका आहे.

नवरात्रीत लाखो भक्त देविंच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिर प्रशासनाने उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. दररोज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात असून भगवतीच्या दर्शनासाठी भक्तांनी यावं असं आवाहन मंदिर प्रशासनाने केलंय.

नवसाला पावणारी देवी अशी या क्षेत्राची आख्यायीका असल्याने दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. देवींचे दर्शन घेतल्याने नवी उर्जा आणि समाधान मिळत असल्याची भावना भक्त व्यक्त करताहेत. तुम्हालाही साडेतीन शक्तीपिठांचे एकत्रीत दर्शन करायचे असेल तर अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवती गाव गाठावं लागेल.

Navratri Utsav 2023
Blue Dosa Video: खाते रहो! सोशल मीडियावर Viral झालाय निळा डोसा; VIDEO पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com