Shardiy Navratri 2022 : नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्यापूर्वी, 'हे' नियम जाणून घ्या

देवी दुर्गेच्या मूर्तीची स्थापना नेहमी पूर्व दिशेला करावी, कारण पूर्व दिशा ही सकारात्मक उर्जेचा स्रोत मानली जाते.
Navratri 2022
Navratri 2022Saam Tv

Shardiy Navratri 2022 : अवघ्या काही दिवसानंतर घटस्थापना होणार आहे. यंदा नवरात्री उत्सव हा २६ सप्टेंबरपासून सुरू होईल. या नऊ दिवसांच्या नवरात्रीमध्ये (Navratra) आपण मातेच्या व्रतातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देतो.

कोणत्याही विशेष व्रत-उत्सवात (Fast ) मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशा योग्य ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. योग्य दिशा निवडणे फार गरजेचे आहे कारण पुराणात देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी दिशा सांगितली आहे.

Navratri 2022
Navratri Mantra 2022 : नवरात्रीच्या नऊ दिवसांत जपा 'हे' मंत्र, नांदेल घरात सुख-समृध्दी!

देवी दुर्गेच्या मूर्तीची स्थापना नेहमी पूर्व दिशेला करावी, कारण पूर्व दिशा ही सकारात्मक उर्जेचा स्रोत मानली जाते. यासोबतच अलौकिक शक्तीचा प्रवाह देखील पूर्व दिशेकडून येतो, त्यामुळे प्रतिष्ठापनेसाठी पूर्व दिशा ही दिशांमध्ये अधिक योग्य आहे. यासोबतच उपवास करताना आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी.

१. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या पूजेसाठी मंत्र जपताना चंदनाची माळ उपलब्ध असेल, तर तीच वापरावी कारण ती देवीच्या मंत्र साधनेत श्रेष्ठ मानली जाते.

२. जर नवरात्रीत देवी लक्ष्मीची पूजा करत असाल तर तिच्या मंत्रांचा जप करण्यासाठी स्फटिक माळ किंवा कमळाची माळ वापरा .

३. नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्रांचा जप दररोज नियमित संख्येने करावा . कमी किंवा जास्त मंत्र कधीही करू नका . मंत्र जपण्यासाठी इतरांची मुद्रा वापरू नका आणि ठराविक वेळी ठराविक ठिकाणीच मंत्राचा जप करा. अनेकांना बसून हात पाय हलवण्याची सवय असते. अशा परिस्थितीत देवीच्या मंत्राचा जप करताना याची विशेष काळजी घ्या आणि शरीराची अजिबात हालचाल करू नका.

४. शक्तीची साधना करण्यासाठी नेहमी लोकरीचे आसन किंवा घोंगडी वापरावी . जर नवरात्रीमध्ये देवी कालीची साधना करत असाल तर काळ्या रंगाच्या वस्तूंचा विशेष वापर करावा. जसे काळे कपडे आणि काळ्या रंगाचे आसन इ.

Navratri 2022
Navaratri 2022 : नवरात्रीच्या काळात 'या' प्रसिध्द मंदिरांना भेट द्या, त्यापैकी 'हे' मंदिर उत्तराखंडात आहे नावाजलेले !

५. दुर्गापूजेत वेळोवेळी अनेक गोष्टींची गरज भासत असते . ते आगाऊ गोळा करून ठेवले पाहिजेत .

६. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करताना आपले तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावे .

९. नवरात्रीमध्ये शक्तीच्या उपासनेचे शुभ फल मिळविण्यासाठी उपवास करणे आवश्यक आहे. एक दिवस ठेवा किंवा नऊ दिवस, नवरात्रीत नऊ दिवस उपवास ठेवल्यास कोणतेही पदार्थ सेवन करण्यापूर्वी आई जगदंबेला भोग म्हणून अर्पण करावे .

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com