Navratri Mantra 2022 : नवरात्रीच्या नऊ दिवसांत जपा 'हे' मंत्र, नांदेल घरात सुख-समृध्दी!

वेद आणि शास्त्रानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मंत्रांचा जप करणे महत्त्वाचे आहे.
Navratri Mantra 2022
Navratri Mantra 2022Saam TV

Navratri Mantra 2022 : अवघ्या काही दिवसात नवरात्रीचा उत्सव सुरु होईल. यंदा हा दिवस २६ सप्टेंबर पासून सुरु होत असून ५ ऑक्टोबर २०२२ ला याची सांगता होईल.

या दिवसात नवदूर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या नवरात्रीचे (Navratra) नऊ दिवस साजरे करण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. नवरात्रीच्या वेळी आपल्या घरात (Home) नऊ देवींचे शुद्ध आत्म्याने आणि अंतःकरणाने स्वागत करणे महत्वाचे आहे जेणेकरून ते आपल्या जीवनावर आशीर्वाद देतील आणि निरोगी आणि समृद्ध जीवन जगू शकतील.

Navratri Mantra 2022
Shardiya Navratri 2022 : शारदीय नवरात्रीत आहे 'या' दिवशी शुभ योग, अशा पध्दतीने पूजा केल्यास होतील लाभ !

वेद आणि शास्त्रानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मंत्रांचा जप करणे महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की ते आपल्या घरात सुख व समृध्दी नांदते.

मन एकाग्र करण्यासाठी या मंत्राचे उच्चारण पठण केल्यास अनेक संकंटावर मात करता येते. पण नवरात्रीच्या या नऊ दिवसांत कोणते मंत्र जपावेत याविषयी काहींच्या मनात संभ्रम असू शकतो. त्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणते मंत्र जपायला हवे हे जाणून घेऊया.

Navratri Mantra 2022
Shardiya Navratri 2022: नवरात्रीमध्ये 'या' स्तोत्राचे करा पठण, भीतीपासून मुक्ती मिळेल !

१. पहिली माळ - देवी शैलपुत्री

वंदे वाद्द्रिछतलाभाय चंद्रार्धकृतशेखराम |

वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम्‌ ||

२. दुसरी माळ - देवी ब्रम्हचारिणी

दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू।

देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥

३. तिसरी माळ - देवी चंद्रघंटा

पिण्डज प्रवरारुढ़ा चण्डकोपास्त्र कैर्युता |

प्रसादं तनुते मह्यं चंद्र घंष्टेति विश्रुता ||

४. माळ चौथी - देवी कुष्मांडा

सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च ।

दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे ॥

५. माळ पाचवी - देवी स्कंदमाता

सिंघासनगता नित्यम पद्माश्रितकरद्वया |

शुभदास्तु सदा देवी स्कन्द माता यशश्विनी ||

६. माळ सहावी - कात्यायनी

कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि ।

नन्द गोपसुतं देविपतिं मे कुरु ते नमः ॥

Navratri Mantra 2022
Navaratri 2022 : नवरात्रीच्या काळात 'या' प्रसिध्द मंदिरांना भेट द्या, त्यापैकी 'हे' मंदिर उत्तराखंडात आहे नावाजलेले !

७. माळ सातवी - कालरात्री

वाम पादोल्ल सल्लोहलता कण्टक भूषणा |

वर्धन मूर्ध ध्वजा कृष्णा कालरात्रि भर्यङ्करी ||

८. माळ आठवी - महागौरी

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः |

महागौरी शुभं दद्यान्त्र महादेव प्रमोददा ||

९. माळ नववी - सिद्धिधात्री

सिद्धगधर्व यक्षाद्यैरसुरैरमरैरपि।

सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी।।

या मंत्राचा जप केल्यास घरात नांदेल सुख समृध्दी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com