Shakun Shastra saam tv
लाईफस्टाईल

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

शकुन शास्त्रानुसार दैनंदिन जीवनातील काही घटना भविष्यासंदर्भात संकेत देतात. हातातून मीठ, तेल, दूध किंवा पूजेची थाळी पडणं अशुभ मानलं जातं. या घटनांमागील धार्मिक आणि ज्योतिषीय अर्थ जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

धार्मिक मान्यतांमध्ये शकुन शास्त्राला देखील खूप महत्त्व देण्यात आलं आहे. दैनंदिन जीवनातील लहान घटना आपल्याला भविष्याबद्दल अनेक महत्त्वाचे संकेत देतात. अचानक एखाद्याच्या हातातून काही वस्तू पडणं हे एक अशुभ मानलं जातं. जे आपल्याला येणाऱ्या संकटांबद्दल इशारा देते असतं. चला या गोष्टींचा पाहूयात ज्या हातातून पडणं अशुभ मानण्यात येतं.

मीठ पडणं

वडीलधारी लोक अनेकदा म्हणतात की, मीठ कधीही हातातून खाली पडू नये कारण त्यामुळे कुटुंबावर संकट येतं. मीठ शुक्र आणि चंद्राशी संबंधित असल्याचं मानलं जातं. म्हणूनजर ते हातातून पडले तर ते आर्थिक परिस्थिती बिघडण्याचे आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेदाचे संकेत देतं.

तेल पडणं

जर तुमच्या हातून घरात तेल पडलं तर ते देखील खूप अशुभ मानण्यात येतं. असं झाल्यास शनीचा प्रकोप मानला जातो. यामुळे घरावर एखादं मोठं संकट येणार असल्याचं म्हटलं जातं. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

दूध सांडणं

तुमच्या हातातून दुधाचा ग्लास पडणं किंवा दूध सांडणं हे चंद्र दोष दर्शवतं. यामुळे घरात अशांतता येण्याचा धोका मानला जातो. त्याचप्रमाणे कुटुंबातील व्यक्तींवर मानसिक ताणही वाढू लागतो.

पूजेची थाळी पडणं

हातातून पूजेची थाळी किंवा दिवा पडणं हे देखील एक अशुभ शकुन मानण्यात येतं. असं म्हटलं जातं की, यामुळे येणाऱ्या काळात वाईट बातमी येऊ शकते.

काळी मिरी पडणं

तुमच्या हातातून काळी मिरी पडणं हे कौटुंबिक भांडणं होणार असल्याचे संकेत आहे. ही घटना असंही दर्शवते की, तुमचे जवळचे मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी असलेलं नातं बिघडणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs SRH: हेड-क्लासेनच्या वादळी खेळीनं मुंबई इंडियन्सला नमवलं; घरच्या मैदानात MI लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT