Manasvi Choudhary
नियमितपणे मेकअप केल्याने चेहरा खराब होतो यासाठी नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी महिलांनी खास घरगुती उपाय करावेत.
तुमच्या स्वयंपाकघरातील वस्तू तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणतील अश्या वस्तू कोणत्या आहेत ते पाहूया.
हवामान कोणतेही असो, त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या
कच्चे दूध हे सर्वोत्तम नैसर्गिक 'क्लीन्सर' आहे. यात असलेल्या लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचेवरील साचलेली घाण आणि मृत पेशी निघून जातात.
कोरफड जेल रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा आणि हलका मसाज करा. सकाळी चेहरा धुवा यामुळे चेहऱ्यावरची घाण निघून जाते
स्प्रे बाटलीत गुलाब पाणी भरून ते दिवसातून २-३ वेळा चेहऱ्यावर मारत राहा किंवा रात्री कापसाने लावा.
पिकलेल्या पपईचा तुकडा चेहऱ्यावर ५-१० मिनिटे चोळा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. टॅनिंग कमी होईल