Early symptoms of kidney disease saam tv
लाईफस्टाईल

Early symptoms of kidney disease: किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात ७ मोठे बदल; दुर्लक्ष केल्यास पूर्णपणे निकामी होईल किडनी

Kidney failure symptoms: ज्यावेळी किडनीचे कार्य हळूहळू बिघडू लागते तेव्हा शरीरात अनेक बदल दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास किडनी पूर्णपणे निकामी होऊ शकते. त्यामुळे हे बदल वेळीच ओळखणं गरजेचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे किडनी हा देखील एक महत्त्वाचा अवयव मानला जातो. किडनी केवळ रक्त शुद्ध करणं एवढंच काम करत नाही, तर शरीरातील महत्वाचे पोषकतत्त्वांचा समतोलही राखतं. जेव्हा किडनीचं कामकाज मंदावू लागतं, तेव्हा अनेकदा त्याची सुरुवातीची लक्षणं दुर्लक्षित केली जातात.

ज्यावेळी किडनीच्या कार्यामध्ये कोणतेही बदल होतात तेव्हा शरीरात काही लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे. जेणेकरून कोणतीही समस्या असल्यास आपण त्यावर उपचार करू शकतो.

लघवीत बदल जाणवणं

जर लघवी करताना ती फेसाळ वाटत असेल, तर ते किडनी डॅमेजचं लक्षण असू शकतं. कारण किडनीमधून आवश्यक प्रोटीन लीक होऊ लागतात, आणि ते लघवीतून बाहेर येतात. त्याशिवाय लघवीच्या रंगात बदल होणं किंवा वारंवार लघवी लागणं हेही संकेत असू शकतात.

त्वचा कोरडी पडणं

किडनी नीट काम न केल्यास शरीरात टॉक्सिन्स आणि मिनरल्सचं प्रमाण असंतुलित होतं. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. परिणामी तुमच्या त्वचेला खाज येऊ लागते. हा त्रास सकाळी अधिक त्रास जाणवतो. ही लक्षणं सौम्य वाटली तरी दुर्लक्षित करू नयेत.

तोंडाची दुर्गंधी

झोपेतून उठल्यावर तोंडात विचित्र वास येत असेल तर सावध व्हा. याचं कारण म्हणजे ही यूरेमिक फेटर ची सुरुवात असू शकते. किडनी नीट काम करत नसल्याने रक्तात टॉक्सिन्स साचतात, आणि त्याचा परिणाम श्वासाच्या वासावर होतो.

श्वास घेण्यात त्रास होणं

किडनी फेल होण्याच्या प्रक्रियेत फुफ्फुसांमध्ये पाणी साचू लागतं. या समस्येमुळे तुम्हाला श्वास घेणं कठीण होतं. याचवेळी अ‍ॅनिमियामुळे शरीरात लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे शरीराच्या उर्वरित भागांना पुरेशी ऑक्सिजन मिळत नाही.

भूक न लागणं

जेव्हा किडनी टॉक्सिन्स फिल्टर करत नाही, तेव्हा ते रक्तात साचून यूरेमिया निर्माण होतो. यामुळे मळमळ, उल्टी, पोट बिघडणं, खाण्याची इच्छा कमी होणं या तक्रापी उद्भवू लागतात.

सकाळीच थकवा वाटणं

जर तुम्हाला झोपेतून उठल्यावर शरीर अगदी थकल्यासारखं वाटत असेल तर हे किडनीच्या समस्यांचं एक लक्षण मानलं जातं. कारण अशावेळी शरीरातून विषारी घटक बाहेर टाकले जात नाहीत. आणि त्यामुळे थकवा येतो.

लघवीत रक्त दिसणं

लघवीत रक्त दिसणं हे सामान्यपणे लोक घाबरून जातात, पण अनेकदा हे किडनीच्या संसर्गामुळे किंवा स्टोनमुळे होतं. मात्र, जर वेदना नसेल आणि तरीही लघवीत रक्त येत असेल, तर हे रीनल सेल कार्सिनोमा किंवा ब्लॅडर कॅन्सर यांसारख्या गंभीर आजाराचं संकेत ठरू शकतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात वाघाच्या हल्यात महिला ठार

OBC Reservation: ''आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळ यांचा शरद पवारांना सवाल

Dudhi Halwa Recipe : नवरात्रीचा प्रसाद होईल स्पेशल, झटपट बनवा दुधीचा चविष्ट हलवा

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

SCROLL FOR NEXT